'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली...
Uddhav Thackeray and Raj Thackeray: अवधूत गुप्ते यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
!['खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली... Raj Thackeray gets emotional on Uddhav Thackeray's question in Khupte tithe Gupte of Avdhoot Gupte Zee Marathi 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/31/508c93846292f9ded90a851e1a5adf02168552302780488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray and Raj Thackeray: संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबतचे जुने फोटो दाखवण्यात आले. जुन्या फोटोंची एक एव्ही तयार करण्यात आली होती. एव्ही पाहताना राज ठाकरे काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. एव्ही संपल्यानंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? असा सवाल गुप्तेंनी राज ठाकरेंना विचारला. त्यानंतर मात्र राज ठाकरेंच्या शांत बसले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवार, शरद पवार आणि रिफायनरीवरही आपली भूमिका मांडली.
अवधूत गुप्ते यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम झी मराठीवर 4 जून रोजी प्रसारीत केला जाणार आहे. याच कार्यक्रमात गुप्तेंनी राज ठाकरेंसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : खुपते तिथे गुप्ते!| Raj Thackeray : ते दिवस छान होते, कुणी विष कालवलं माहीत नाही; राज ठाकरे भावूक
प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना म्हणतात की, "हा खुपण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये आम्ही दोन व्यक्तिंच्या मनात बोचलेले काटे असतात. ते काढण्याचा गोड प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एक छोटीशी क्लिप तयार केलीये. ती दाखवू मग प्रश्नांकडे येऊ." हे ऐकून राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे प्रश्नार्थक दिसत आहेत. एवढ्यात एव्ही प्ले होते आणि हळूहळू राज ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळतं. एव्हीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो एकत्र केले होते.
उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणार? राज ठाकरे म्हणाले...
एव्ही संपल्यानंतर अवधूत गुप्तेंनी एव्ही पाहुन काय वाटलं याबाबत विचारलं. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, "खूप छान दिवस होते ते, माहित नाही मला कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लावली". त्यावर गुप्ते म्हणाले की, परत येऊ शकतात हे दिवस? त्यानंतर मात्र राज ठाकरे शांत झाले... पण त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. आता राज ठाकरेंच्या स्मितहास्याचा नेमका अर्थ काय? पुढे राज ठाकरे काय म्हणाले, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Raj Thackeray: अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत; वाचा काय म्हणाले राज ठाकरे...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)