एक्स्प्लोर

Abhijeet Sawant : 'अभिजीत सावंत रनर अप ठरला पण...', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं खास पत्र; सूरजला दिलेल्या पाठिंब्याचंही केलं खास कौतुक

Abhijeet Sawant : अभिनेता पृथ्वीक प्रतापने अभिजीत सावंतसाठी एक खास पत्र लिहिलं आहे.

Abhijeet Sawant :   बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा रनरअप ठरला. त्याचप्रमाणे सूरज चव्हाण (Suraj Chavan) या सीझनचा विजेता ठरला. पण असं असलं तरीही अनेकांना अभिजीत या सीझनचा विनर व्हायला हवा होता, अशी इच्छा होती. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. पण नुकतच एका अभिनेत्याने अभिजीतसाठी एक खास पत्र लिहिलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने अभिजीतसाठी एक खास पत्र लिहिलं आहे. अभिजीत हा इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता आहे. तेव्हापासून अभिजीत सावंत हे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचंय. त्याच्या गाण्याचा चाहतावर्ग आजही खूप मोठा आहे. अशाच काही आठवणी पृथ्वीकने या पत्रातून सांगितल्या आहेत. 

पृथ्वीक प्रतापचं अभिजीतसाठी खास पत्र

पृथ्वीकने त्याच्या पत्रामध्ये म्हटलं की, मी सातवी-आठवीत असताना दिवाळीच्या दरम्यान माझ्या मामाने घरी एक MTNL landline फोन बसवून घेतलेला. ज्यावर फोन आलेला नसताना सुद्धा ‘हॅलो’ म्हणायला भारी वाटायचं. कित्येकदा तर आम्ही स्वतःच त्याची रिंग वाजवायचो जी माळ्यावरच्या आठही खोल्यांना ऐकू जायची आणि मग सगळ्यांना कळलं फोन आलाय की हॅलो म्हणायचो… खरंतर तेव्हा outgoing calls ना खूप पैसे लागायचे आणि incoming calls ना सुद्धा त्यामुळे त्या फोनचं आम्ही फक्त वोळणं करून टाकलेलं. थोडक्यात काय तर, काही काळापर्यंत ‘शायनिंग’ मारण्यापलीकडे त्या फोनचा वापर मी तरी कधी केला नव्हता.

हळुहळू वार्षिक परीक्षा ही जवळ आलेली त्यामुळे फोनबरोबर खेळत बसणं, TV बघणं हे सगळं कमी झालेलं, केबल काढून TV तर बंदच होणार होता पण, तरीही त्यातल्या त्यात, मामी, आज्जी आणि आई ‘वादळवाट, अवंतिका, वगैरे’ मालिका आवडीने पाहायच्या म्हणून केबल चालू राहिला. पण, अचानक आमच्या मामाने या लिस्ट मध्ये अजून एक कार्यक्रम Add केला… ज्याचं नाय होतं INDIAN IDOL.

‘अरे आपला एक मराठी पोरगा आहे “अभिजीत सावंत या एका feeling साठी आम्ही कार्यक्रम पाहायला सुरुवात केली आणि TV पाहण्याची वेळ थोडी आणखी वाढली. मग काय… सगळेच हा कार्यक्रम पाहताना अभिजीत सावंतच्या गोड स्माइलच्या आणि गोड आवाजाच्या प्रेमातच पडले.

सांगायचा मुद्दा हा की, INDIAN IDOL च्या फिनालेचा विजेता अभिजीत सावंतच व्हावा यासाठी जमतील तेवढे प्रयत्न केले होते. शाळेत, बिल्डिंगमध्ये जिथे जाईन तिथे अभिजीत सावंतच जिंकला पाहिजे अशी मौखिक प्रसिद्धी सतत केली. पण, फक्त तेवढं करून चालणार नव्हतं कारण तो जिंकणार की नाही हे व्होट्सवर ठरणार होतं. म्हणून, इतक्या दिवसात फोनचं खेळणं थांबवलेलं ते पुन्हा सुरु केलं.

INDIAN IDOL चा अभिजीत सावंतचा voting number गणिताच्या वहीच्या मागच्या पानावर लिहून घेतला होता. अर्थात तो आधी पाठ केला होता. १२०० २४२४ २५२५०२. हा ’02’ फार महत्वाचा होता कारण, तो चुकला तर आपलं वोट ‘अमित साना’ ला वगैरे जाऊ शकतं अशी सतत भिती होती. घरातल्यांसमोर हा फोन लावू शकत नव्हतो कारण त्याचे साधारण प्रति फोन ३ रुपये वगैरे लागणार होते. म्हणून रात्री अपरात्री सगळे झोपल्याची खात्री करून मगच अभिजीत सावंतला वोट केलंय, तो जिंकावा यासाठी खूप प्रार्थना वगैरे सुद्धा केल्यात. ज्यादिवशी तो जिंकला त्यादिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये फटाके सुद्धा फोडलेले काहींनी, कारण फिलिंगच बाप होतं ना ‘मराठी माणूस जिंकल्याचं’. अभिजीत जिंकला होता तेव्हा चेहऱ्यावर तेच स्मित हास्य, रनर अप अमित सानाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सुद्धा गायला सांगितलं होतं त्याने. तेव्हाचं कळलं होतं माणूस म्हणून पण भारी आहे हा.

पुढच्या महिन्यात आलेलं फोनचं बिलं पाहून मामा गांगरला होता. त्यानंतर तो फोन बंदच ठेवण्यात आला. पुढे मामाने सॅमसंगचा मोबाईल घेतला आणि त्याचे महत्वाचे फोन उचलायला सुरुवात केली. पण, तेव्हा अभिजीत सावंत जिंकला होता.

तब्बल 20 वर्षांनी त्याला आणखी एका शोमध्ये बघून खूप बरं वाटलं. पण यावेळी दोन्ही फायनलिस्ट खूपचं आवडते होते. सूरज जिंकला तेव्हा मन भरून आलं. गरिबाचं पोरं प्रस्थापितांच्या दुनियेत काहीतरी जादू करू पाहतय हे दिसलं. अभिजीत सावंत रनर अप ठरला पण, त्याच्यानंतर सुद्धा ज्या मायेने तो सूरजशी वागत होता ते बघून त्याच्याविषयी आदर आणखी वाढला. साला एकदातरी भेटलं पाहिजे या माणसाला असं वाटलं. आणि परवा फुलवंतीच्या प्रीमियरला आमची भेट झाली. मी थोडा excite झालो होतो. मी जाऊन अभिजीत सावंतला भेटलो त्याला म्हणालो… ‘hi, अभिजीत दादा खूप आवडतोस तू मला. Big Fan त्यावर एक सेकंद ही न लावता तो म्हणाला ‘अरे सेम टू यू… मी हास्यजत्रा पाहतो फार आवडीने.. infact मी तुला ‘झी मराठी’वरच्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेपासून बघतोय, माझी फॅमिली तुझं काम enjoy करते.

हे ऐकून मी सरप्राईज झालो. काय बोलू कळेना. त्याने मात्र खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्या फार प्रेमाने गळाभेट केली. बाजूलाच गोस्वामी सर उभे होते त्यांना सुद्धा आवर्जून भेटला. कार्यक्रम आवडतो हे सांगितलं आणि हसत हसत आणखीन एक आनंद देऊन त्याच्या गोड स्माईलने इतरांना भेटू लागला.

ही पोस्ट माझ्या त्या आवडत्या माणसाच्या कौतुकासाठी…

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

ही बातमी वाचा : 

Toll Naka song : 'येक नंबर' सिनेमातल्या गाण्याची तुफान चर्चा, टोलच्या प्रश्नांवरुन 'अभिनेते राज ठाकरे' बनले 'रॅपस्टार'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Ind vs Aus 3rd Test : पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षीत बदल?
शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षीत बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांगDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारीKishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारीMaharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Ind vs Aus 3rd Test : पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षीत बदल?
शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षीत बदल?
Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Nashik News : नववर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे, गणवेश अन् ओळखपत्राची सक्ती, नाशिक जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
नववर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे, गणवेश अन् ओळखपत्राची सक्ती, नाशिक जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
थरकाप! तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
थरकाप! तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
Embed widget