Toll Naka song : 'येक नंबर' सिनेमातल्या गाण्याची तुफान चर्चा, टोलच्या प्रश्नांवरुन 'अभिनेते राज ठाकरे' बनले 'रॅपस्टार'
Toll Naka song : येक नंबर सिनेमातील टोलच्या प्रश्नावरील गाण्याची सध्या तुफान चर्चा आहे.
![Toll Naka song : 'येक नंबर' सिनेमातल्या गाण्याची तुफान चर्चा, टोलच्या प्रश्नांवरुन 'अभिनेते राज ठाकरे' बनले 'रॅपस्टार' Toll Naka song from Raj Thackeray Movie Yek Number Tejaswini Pandit Producer Entertainment news in marathi Toll Naka song : 'येक नंबर' सिनेमातल्या गाण्याची तुफान चर्चा, टोलच्या प्रश्नांवरुन 'अभिनेते राज ठाकरे' बनले 'रॅपस्टार'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/15/f044bd30730aa4ea702ea694f28f436a1729011753856720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Toll Naka song : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आधारित 'येक नंबर' (Yek Number) हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजपूर्वीच या सिनेमाची तुफान चर्चा होती. त्यातच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं होतं. पण सध्या सोशल मीडियावर याच सिनेमातील एका गाण्याने धुमाकूळ घातलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेवरच या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
राज्य सरकारकडून मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल मोफत करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्याच दिवशी राज ठाकरेंवर आधारित सिनेमातील हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात राज ठाकरेंच्या भूमिकेतील अभिनेता टोल नाक्यावर उतरुन प्रश्न विचारण्याचं आवाहन जनतेला करत असल्याचं पाहायला मिळतंय.
'येक नंबर' सिनेमातील टोल नाका गाणं
येक नंबर या सिनेमात टोल नाक्यावर आधारित असलेलं हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल प्रश्न हा कायमच लावून धरला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयानंतर मनसैनिकांकडून आनंदही व्यक्त करण्यात आला. त्यातच आता त्यांच्यावर आधारित सिनेमातलं गाणंही नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय.
राज ठाकरेंवर आधारित सिनेमा
धैर्य घोलप आणि सायली पाटील हे दोघे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. धैर्य आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम असतं, त्यामुळे ते प्रेम सिद्ध करण्यासाठी सायली त्याला मुंबईत जाऊन राज ठाकरेंना गावात घेऊन येण्याचा हट्ट करत. त्यानंतर मुंबईत जाऊन राज ठाकरे आणि धैर्य घोलपची भेट कशी होते, असा सगळा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)