Premachi Goshta : मिहिका-हर्षवर्धनचं लग्न, सावनीचा जळफळाट; मुक्ता आणि सागर आता काय करणार?
Premachi Goshta : सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका बरीच रंजक वळणावर आहे. त्यातच आता हर्षवर्धनने महिकासोबत लग्न केलं आहे.
Premachi Goshta : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच एक मोठा ट्विस्ट सध्या मालिकेत आला आहे. कारण हर्षवर्धनने मुक्ताची बहिण माहिकीसोबत लग्न केलंय. याचा मुक्ता, सागर आणि मिहिरला चांगलाच धक्का बसलाय.
सावनी आणि हर्षवर्धनचं लग्न सुरु असतानाच मुक्ता हर्षवर्धनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तिचा हा प्लॅन फसतो आणि तिच त्यामध्ये अडकते. हर्षवर्धनच्या विरोधात पुरावे गोळा करत असताना मिहिका हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकते. पण हे सगळं पाहून
मिहिका आणि हर्षवर्धनचं लग्न
मिहिकासोबत गैरवर्तन केल्यानंतर घरातले सगळेच काळजीत असतात. मुक्तालाही मिहिकाची काळजी असते. त्यातच मिहिका अचानक घरातून गायब होते. त्यावेळी सगळेच चिंतेत असतात. तेव्हा मिहिरला मिहिका वॉईज मेसेज पाठवते, त्यामध्ये ती त्याला म्हणते की, मी माझ्या एका मैत्रिणीकडे आले आहे, तुम्ही कुणी माझी काळजी करु नका. मला थोडी स्पेस हवी आहे. त्यावर मुक्ता चिडते आणि त्यानंतर सगळेच मिहिकाच्या त्या मैत्रीणीचा शोध घ्यायला सुरुवात करतात.
मुक्ताची अवस्था पाहून इंद्रा देखील काळजीत असते. तेवढ्यात लकी टिव्हीवर हर्षवर्धनच्या लग्नाची बातमी ऐकतो. ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पण सगळे थक्क होतात, ते हर्षवर्धनची बायको पाहून. हर्षवर्धनची बायको म्हणून मिहिका सगळ्यांसमोर येते. हे पाहून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यावर मुक्ता हर्षवर्धनच्या घरी जाऊन मिहिकाला जाब विचारते. त्यावर मिहिका देखील मी हर्षवर्धनसोबत माझ्या मर्जीने लग्न केलं असल्याचं म्हणते. त्यामुळे आता यावर मुक्ता आणि सागर काय करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
सावनीचा जळफळाट
दरम्यान सावनीला देखील हर्षवर्धनच्या लग्नाच्या बातमीमुळे मोठा धक्का बसतो. पण ती मिहिकाला तिच्या वापरलेल्या साड्या लग्नाची भेट म्हणून देते. त्यावर ती मिहिकाला म्हणते की, यात मी वापरलेल्या साड्या आहेत, असंही तुला आणि तुझ्या बहिणीला मी वापरलेल्या गोष्टीच जास्त आवडतात. आता मिहिकाने हर्षवर्धनसोबत मनापासून लग्न केलं आहे की जबरदस्तीने हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.