एक्स्प्लोर

Nashik Bribe: नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार

Nashik Bribe: फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nashik Bribe: फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबईनाका पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दोन्ही पोलीस उपनिरीक्षक पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. शकुंतला हाइट्स, कामटवाडे रोड, सिडको) आणि अतुल भुजंगराव क्षीरसागर (रा. सिंहगड, शासकीय विश्रामगृह) अशी या संशयित उपनिरीक्षकांची नावे आहेत.

Nashik Bribe: उपहारगृह चालक पिता-पुत्रांमार्फत ‘मध्यस्थी’

या प्रकरणात गडकरी चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहाचे चालक रमेश गंभीरराव आहिरे आणि त्यांचा मुलगा कल्पेश रमेश आहिरे यांनी मध्यस्थी केल्याचे उघड झाले आहे. क्षीरसागरच्या माध्यमातून गोडे याच्यापर्यंत पोहोचत, चौघांनी संगनमताने लाचेची रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात हे दोन्ही उपनिरीक्षक कार्यरत आहेत, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

Nashik Bribe: लाच मागणीची पडताळणी; सापळ्यात रक्कम स्वीकारताना पकडले

या प्रकरणातील मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित असून, तो व्यवसायाने कंत्राटदार आहे. अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याची मागणी उपनिरीक्षकांमार्फत उपहारगृह चालक कल्पेश आहिरे याने केल्याचे तपासात समोर आले.

मात्र, केतन पवारने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता, लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात सापळा रचला. सापळ्यादरम्यान कल्पेश आहिरे याने पंचासमक्ष दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, ही रक्कम दत्तात्रय गोडे आणि अतुल क्षीरसागर यांच्यासाठीच घेतल्याची कबुली त्याने दिली.

Nashik Bribe: एसीबीची कारवाई, निलंबनाची शक्यता

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्यासह हवालदार योगेश साळवे आणि दिनेश खैरनार यांच्या पथकाने केली. सध्या दोन्ही पोलीस उपनिरीक्षक पसार असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीच्या पोलीस निरीक्षक पूनम केदार करत आहेत.

Nashik Bribe: क्षीरसागर ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय

या प्रकरणात अतुल क्षीरसागर हा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मूळ तक्रारदार केतन पवार हा देयके काढण्यासाठी नेहमीच शासकीय विश्रामगृहात येत-जात असल्याने त्याची आहिरे पिता-पुत्रांशी ओळख झाली होती. दाखल गुन्ह्यातून सुटका मिळवण्यासाठी पवारने उपहारगृह चालकांकडे मार्गदर्शन मागितले. त्यावेळी आहिरे पिता-पुत्रांनी विश्रामगृहात वास्तव्यास असलेल्या क्षीरसागरशी असलेली ओळख वापरत मध्यस्थी केली, तर क्षीरसागरने पुढे दत्तात्रय गोडे याच्याशी संपर्क साधून जामीन मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी चौघांनी मिळून दोन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.  

आणखी वाचा 

Parbhani News: मोठी बातमी! परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारचं टोकाचं पाऊल; जामिनावर सुटून घरी आला अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget