Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
यावर्षी ‘बिग बॉस मराठी’ची थीम आहे दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. एंट्रीलाच घरात स्पर्धकांना दोनपैकी एका प्रवेशद्वाराची निवड करायची होती.

Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना बिग बॉस मराठी 6 अखेर पडद्यावर दाखल झाला आहे. नव्या घराची झलक, बदललेले नियम आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या स्पर्धकांमुळे यंदाचा सिझन धमाकेदार असणार यात शंका नाही. यंदा एकूण 17 स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले असून, यात सिनेमा-टीव्ही इंडस्ट्रीतील अनुभवी चेहरे, गायक, नर्तक, फिटनेस आयकॉन्स आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले इन्फ्लुएन्सर्स यांचा समावेश आहे. प्रत्येक जण आपली वेगळी ओळख, अनुभव आणि स्वभाव घेऊन घरात आला आहे. यावर्षी ‘बिग बॉस मराठी’ची थीम आहे दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. एंट्रीलाच घरात स्पर्धकांना दोनपैकी एका प्रवेशद्वाराची निवड करायची होती. काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलं, तर काही मेहनतीचा मार्ग स्वीकारला आहे.
बिग बॉसच्या घरात कोणाची एन्ट्री?
दीपाली सय्यद
मनोरंजन आणि राजकारणाच्या दुनियेत कायम चर्चेत राहिलेली दिपाली सय्यद यंदाच्या सीझनमधील महत्त्वाचा चेहरा ठरत आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे घरात वादळ उठण्याची शक्यता आहे.
सागर कारंडे
हास्याचा तडका देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता-संहिता सागर कारंडे घरात आला असून, त्याची विनोदी शैली घराचं वातावरण हलकं-फुलकं करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक, सागर कारंडे बिग बॉसच्या घरात येऊ शकतो अटकळ बांधत होते.
सचिन कुमावत
संगीतप्रेमींसाठी खान्देशी लोकसंगीताचा खास रंग घेऊन गायक सचिन कुमावत घरात दाखल झाला आहे.
सोनाली राऊत
ग्लॅमरचा जोर वाढवण्यासाठी सुपर मॉडेल सोनाली राऊतने एन्ट्री घेतली असून, हिंदी बिग बॉसमधील अनुभव तिच्या खेळाला वेगळं वळण देऊ शकतो.
तन्वी कोलते
टीव्ही इंडस्ट्रीतून ओळख निर्माण केलेली तन्वी कोलते टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली. योग्य वेळ साधून खेळ करणं ही तिची ताकद ठरू शकते असे बोलले जात आहे.
आयुष संजीव, राजेश बापट यांची एन्ट्री
कधी बिग बॉसच्या मंचावर बॅकडान्सर असलेला आयुष संजीव आता स्पर्धक म्हणून घरात उभा आहे. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत काम केलेला राकेश बापट याची एन्ट्रीही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या स्पर्धकांमुळे मिळणार घरातील खेळला वेगळी धार
सुरेल आवाजासाठी ओळखली जाणारी गायिका प्राजक्ता शुक्रे, दमदार एनर्जी असलेला विशाल कोटीयन आणि फिटनेसचा कट्टर शिस्तप्रिय ओमकार राऊत हे तिघेही घरातील खेळाला वेगळी धार देणार आहेत. त्यांच्यासोबतच लावणीची ठसकेबाज नृत्यांगना राधा पाटील आणि बिनधास्त स्वभावाची दिव्या शिंदे घरात लक्षवेधी भूमिका बजावू शकतात.
नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे
विदर्भातून आलेला बॉडीबिल्डर रोशन भजनकर आपल्या मेहनतीच्या आणि जिद्द यामुळे चर्चेत आहे. तर सोशल मीडिया विश्वातून अनुश्री माने, रुचिता जामदार, प्रभु शेळके आणि करण सोनावणे हे चार चेहरे घरात नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.























