Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गरिबानं मोठं व्हायचंच नाही का? सूरजचं 'गुलिगत' ट्रोलिंग करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी झोड झोड झोडलं
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : आपल्या खास शैलीने व्हिडीओ क्रिएट करणारा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सूरज चव्हाणच्या एन्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सूरजच्या समावेशामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना, ट्रोलिंग करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी झापलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi Season 5) या रिएल्टी शोचा रविवारी थाटात ग्रँड प्रीमियर पार पडला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. त्यानंतर या स्पर्धकांवरुन ट्रोलिंगही सुरू झाले आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ क्रिएट करणारा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सूरज चव्हाणच्या एन्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सूरजच्या समावेशामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना, ट्रोलिंग करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी झापलं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असलेला सूरज चव्हाण याने टिकटॉक आणि त्यानंतर इन्स्टा रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. 'गुलिकत धोका' असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर सूरजचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो.
सूरजवर टीकेचा भडिमार...
बिग बॉस मराठीचा स्पर्धक म्हणून सूरज चव्हाणने एन्ट्री घेतल्यानंतर कलर्स मराठीच्या पेजवर टीकेचा भडिमार सुरू झाला. एकाने म्हटले की, इच्छाच उरली नाही आता बिग बॉस बघायला. एका युजरने म्हटले की हे देवा अशा शोपासून आणि त्यातील अशा स्पर्धकापासून आमचे रक्षण कर. आज बिग बॉस बघणार होतो पण आता बघायची इच्छा नाही, असेही एका नेटकऱ्याने म्हटले. त्याशिवाय, अनेकांनी सूरजवर सडकून टीका केली.
बिग बॉससाठी सूरजला पाठिंबा
सूरज चव्हाणवर टीका होत असताना दुसरीकडे त्याला पाठिंबाही मिळत आहे. ''अरे किती लोक निगेटिव्ह कमेंट करत आहेत...गरीबाला पुढे जाण्याचा हक्क नाही का?'' असा सवालही एकाने केला आहे. आणखी एका युजरने म्हटले की, वाईट कमेंट करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तो त्याचा जिवावर बिगबॉस मध्ये तरी गेला तुमची तर तेवढी पण लायकी नाही. एखाद गरीब पोरग पुढे चाल तर सपोर्ट करा असेही एका नेटकऱ्याने ट्रोलर्सला सुनावले. एकाने म्हटले की, सूरज मागील सहा वर्षांपासून मेहनत घेत आहे. ह्या दरम्यानच्या काळात त्याला निगेटिव्ह बोलणारे अनेकजण होते. पण, सूरजने त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरू ठेवले आणि त्याला ही संधी मिळाली असल्याचे एका युजरने म्हटले.
View this post on Instagram