(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
Premachi Goshta Serial Update : कार्तिककडून मुक्तावर नको ते आरोप केले जातात. आता या सगळ्यात सागर काय भूमिका घेणार? सागर मुक्तावर विश्वास दाखवणार का?
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या मुक्ता आणि सागरच्या प्रेमावर आता मोठे संकट निर्माण झाले आहे. कार्तिकने रचलेल्या चक्रव्यूहात मुक्ता पुरेपूर अडकली असून सागरलाही काही सुचत नाही. इंद्रा आणि स्वातीकडून मुक्तावर संताप व्यक्त केला जात आहे. कार्तिककडून मुक्तावर नको ते आरोप केले जातात. आता या सगळ्यात सागर काय भूमिका घेणार? सागर मुक्तावर विश्वास दाखवणार का, मुक्ताला तुरुंगात का जावे लागले, याचा शोध घेणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.
मुक्ता उघड करणार कार्तिकची विकृती
मुक्ताने कोणाचेही वाईट चिंतले नाही तरी पोलिसांनी का अटक केली यावर बापू चिंता व्यक्त करतात. तर, सागरही मुक्ताला कोणीतरी फसवले असून मी त्याला सोडणार नसल्याचे म्हणतो. मुक्ता कार्तिककडे बोट दाखवून शिक्षा द्यायची तर ह्याला द्या असे सागरला म्हणते. त्यावर इंद्रा मुक्तावर चिडते. सागरला काही कळत नाही, कोणी मला काही सांगेल का असे सागर घरातल्या लोकांना विचारतो. कोणीच काय घडले हे सागरला काही सांगत नाही. अखेर मुक्ता आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला. सागरलाही विश्वास बसत नाही. याआधी कार्तिकने कशी अंगलट केली होती याबद्दलही मुक्ता सांगते.
स्वाती मुक्तावर हात उचलणार...
मुक्ता कार्तिकवर आरोप करत असताना इंद्रा तिच्यावर संतापते. कार्तिक सारख्या देव माणसावर आरोप करते असा उलट प्रश्न करते. स्वातीदेखील मुक्तावर चिडते. माझ्यावर नवऱ्यावर ही खोटे आरोप करते. तुम्ही मला हे आधीच का सांगितले नाही, असे सागर मुक्ताला विचारतो. घरातील वातावरण गढूळ होईल, स्वातीचा विचार करून शांत बसली असे सांगते. मुक्तावर स्वाती हात उचलण्याचा प्रयत्न करते, त्यावर सागर तिला अडवतो आणि मुक्तावर हात उचलण्याचा कोणालाही अधिकार नाही असे सांगतो.
आरतीची दबावात तक्रार...
पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही असे सागर मुक्ताला विचारतो. त्यावर, क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीने कार्तिकच्या दबावात माझ्याविरोधात तक्रार केली असल्याचे मुक्ताने सांगितले. माझ्यावर विश्वास ठेवा असे मुक्ता सागरला विनंती करते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिसांनी कशी अटक केली, हे मुक्ता सागरला सांगते. आरतीनेच माझ्याविरोधात तक्रार केली असल्याचे सांगते. आरतीने मी कामावर मारहाण करते, त्रास देते अशी खोटी तक्रार करते. त्यावर पोलीस अटक करतात, असे मुक्ता सांगते. आरती दबावात येऊन तक्रार करत असल्याचे सांगूनही पोलिसाने दुर्लक्ष केले असल्याचे मुक्ता सांगते.
कार्तिकचे मुक्तावर नको ते आरोप
चांगलीच स्टोरी रचली असल्याचे कार्तिक सांगतो. त्यावर बापू त्याला उलट प्रश्न करतात. खरं काय खोटं काय हे मला कळत नाही असे बापू म्हणतात.
मुक्ता खोटं बोलत असल्याचे कार्तिक सांगतो आणि मुक्तावरच नको ते आरोप करतो. उपकाराच्या मोबदल्यात माझ्याकडून काहीही मागाल का असे कार्तिक मुक्ताला म्हणतो. मुक्ता मी आवडतो असे कार्तिक सांगतो, माझ्याशी मुक्ताने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सागर आणि तिच्या नवरा बायकोचे संबंध असल्याचा आरोप कार्तिक करतो. मुक्ताच्या मागणीवर प्रतिसाद दिला नसल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे कार्तिक सांगतो.
कार्तिकच्या आरोपावर बापू संतापतात आणि तुम्ही काय बोलताय हे लक्षात असू द्या असे बजावतात.
कार्तिक मुक्ताला फसवणार
कार्तिक पुरावे म्हणून मुक्ताने पाठवलेले मेसेज दाखवतो. हे अश्लील मेसेज असल्याचा कावा कार्तिक सांगतो. सागरही या प्रकाराने चक्रावून जातो. कार्तिक फसवत असल्याचे मुक्ता सांगते. स्वातीदेखील मुक्तावर संतापते. इंद्राही यात उडी घेते आणि मुक्तावर आरोप करते.