एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : मुक्ताच्या प्रेमासाठी सागरची किचनमध्ये धडपड; आदित्यसाठी मुक्ता घेणार मोठा निर्णय, सावनीचा जळफळाट

Premachi Goshta Latest Episode : मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी सागरची किचनमध्ये धडपड करणार आहे. तर,दुसरीकडे मुक्ता आदित्यला मदत करण्यासाठी निर्णय घेते. आजच्या एपिसोडमध्ये काय होणार?

Premachi Goshta Latest Episode :  'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta)  मालिकेत सध्या रोमँटिक वळण आले आहे.  स्वाती-कार्तिकचा संसार वाचवल्यानंतर मुक्ताबद्दल सागरच्या मनात आदर वाढला असून आता प्रेम निर्माण होऊ लागले आहे. मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी सागरची किचनमध्ये धडपड  करणार आहे. तर,दुसरीकडे मुक्ता आदित्यला मदत करण्यासाठी निर्णय घेते. 

सावनीने  सागर-मुक्ताच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करत तुमच्यात प्रेम नसल्याचे सांगते. सागरच्या मनात ही बाब टोचत असते. त्यानंतर आता मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी सागर प्रयत्न करतो. त्यासाठी सागर मित्र चैतन्यची मदत घेतो. चैतन्य त्याला वेगवेगळ्या कल्पना देतो. त्यापैकी मुक्तासाठी तिच्या आवडीचा पदार्थ करण्याची कल्पना सागरला आवडते. 

आदित्यसाठी मुक्ताची धडपड 

आदित्यच्या शाळेतील अॅडमिशनसाठी सावनी प्रयत्न करत असते. सई ज्या शाळेत शिकते त्याच शाळेत आदित्यला पाठवण्याचा आग्रह हर्षवर्धन करतो. शाळेच्या मुख्याध्यापिका या आदित्यची मुलाखत घेतात. त्यावेळी आदित्य शाळेत आपले पूर्ण नाव आदित्य हर्षवर्धन अधिकारी असे नाव सांगतो. मात्र, शाळेच्या मु्ख्याध्यापिका वडिलांचे नाव सागर कोळी असल्याचे सांगतात. त्यावर आदित्य ते माझे वडील नाहीत, असे सांगतो. माझ्या वडिलांच्या नावाच्या जागी हे हर्षवर्धन एकच नाव असेल असे म्हणतो. मला माझ्या नावापुढे सागर कोळी हे नाव नकोय हे तुम्हीदेखील लक्षात घ्या असे आदित्य उद्धटपणे मुख्याध्यापिकेला म्हणतो. आदित्यच्या उर्मटपणामुळे संतापलेल्या मुख्याध्यापिका त्याला बाहेर जाण्यास सांगतात. मुख्याध्यापिकेवर आदित्य चिडतो. आदित्यच्या अॅडमिशनला जवळपास मुख्याध्यापिका नकार देतात आणि सावनीलाही केबिनच्या बाहेर जाण्यास सांगतात. 

सावनी केबिन आल्यानंतर मुक्ता आदित्य आणि सावनीला पाहते. त्यानंतर मुक्ता मुख्याध्यापिकेची मदत घेते. मुक्ता मुख्याध्यापिकेला आदित्यची पार्श्वभूमी सांगते. सावनी-सागरच्या घटस्फोटामुळे आदित्य चिडत असेल असे सांगते. त्यामुळे आदित्य थोडा वेळ देण्याची आवश्यकता असून त्याला शाळेत अॅडमिशन देण्याची विनंती करते. त्यानंतर आदित्यचा सहानुभूतीने विचार करून अॅडमिशन देण्यास मुख्याध्यापिका तयार होतात. 

सावनीचा जळफळाट 

मुक्ताच्या विनंतीनंतर मुख्याध्यापिका सावनीला फोन करून आदित्यचे अॅडमिशन करण्या सांगतात. त्यावर सावनी त्यांना म्हणते की, थोड्या वेळापूर्वी तुम्ही नकार दिलेला, आता अचानक काय झाले? त्यावर मुख्याध्यापिका या मुक्ता यांनी आदित्यबाबत सांगितले असल्याचे सांगतात. त्यावर सावनी या मुक्ताला मध्येमध्ये करण्याची काय गरज पडलीय असे म्हणते. शाळेच्या ऑफिसच्या लॉबीमध्ये मुक्ता आणि सावनी समोरासमोर येतात. मुक्ता ही सईला आदित्यकडे पाठवते. त्यावर सावनी मुक्ताला आदित्यच्या अॅडमिशनवरून तिला बोल लावत असताना आदित्य आणि सई या बहिणभावांमध्ये खेळीचे वातावरण दिसून येते. दोघेही आनंदात असतात. हे पाहून सावनीचा जळफळाट होतो. 

मुक्तासाठी सागरची किचनमध्ये धडपड... 

मुक्तासाठी तिच्या आवडीचा पदार्थ तयार करायला सागर मुक्ताच्या आई माधवीची मदत घेतो. माधवी या मुक्ताला पुरणपोळी आवडते असे सांगतात. त्यावर आई सागरला उद्देश्य विचारते. त्यावर सागर आपला हेतू सांगतो. मुक्ताच्या प्रेमासाठी धडपड करणाऱ्या सागरचे माधवीला कौतुक वाटते आणि ती सागरला मदत करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?Ambadas Danve : अंबादास दानवेंवरील कारवाईचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेधCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget