(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Latest Episode : आदित्यच्या खांद्यावरून सागरवर निशाणा; कुटील डावात सावनी होणार का यशस्वी?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून सागरवर निशाणा साधणार आहे. तर, दुसरीकडे मुलाच्या भेटीसाठी सागर आसुसलेला आहे.
Premachi Goshta Latest Episode : सागरवर सूड उगवण्यासाठी नवीन संधीच्या शोधात असते. आदित्यच्या कौन्सिलिंगच्या माध्यमातून तिला ही आयती संधी मिळाली. आता याचा वापर करत सावनी आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून सागरवर निशाणा साधणार आहे. तर, दुसरीकडे मुलाच्या भेटीसाठी सागर आसुसलेला आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता वेगळं येण्याची शक्यता दिसून येत आहे.
समुपदेशनाच्या वेळी आदित्य आणि सागरची भेट होत असल्याने सावनी मुक्तावर चिडते. माझ्यापासून आणि मुलापासून चार हात लांब राहायचे असे सावनी सुनावते. तुझ्याकडे सई आहे ना, मग आदित्यला विसर असे सागरला सांगायचे असे सावनी निष्ठुरपणे म्हणते. मुक्ता सावनीकडे हात जोडून रडत गयावया करते. सागर आणि आदित्यची भेट होणार नसल्याने मुक्ता रडत असते. आपण हरलो असल्याचे मुक्ता माधवीला सांगते. माधवी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं केलं असल्याचे
अखेर आदित्य आला...
इकडं घरी आदित्य होळीला येणार म्हणून उत्साह असतो. सागर आदित्यसाठी सगळी तयारी करतो. आदित्य येणार म्हणून त्याची घालमेल सुरू असते. सागर येणार नाही असे मुक्ताला वाटते. पण, आदित्य कोळी कुटुंबाच्या घरी येतो. मुक्ताचे विचारचक्र सुरू होते. सावनीला त्याला कसे पाठवले असा मुक्ता विचार करत असते. आदित्यला पाहून सागर खूश होतो. त्यावेळी आदित्यला तो घेऊन कोळी कुटुंबात आणतो. आदित्यला पाहून कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. इंद्रा, बापू, लकी, स्वाती असे सगळेजण आनंदात असतात. आदित्यचे लाड होत असतात.
सावनीने आदित्यला का पाठवले?
सावनी आदित्यला पॉवर ऑफ अॅटॉर्नीवर सागरची सही घ्यायला सांगते. हे कागदपत्रे कसली आहेत, हे कोणी विचारले तर शाळेचे पेपर आहेत हे सांग असे सावनी आदित्यला बजावते. वडिलांच्या नावाखाली तुमची सही हवीय असे आदित्य सागरला सांगतो. आदित्यचे हे बोलणं ऐकून सागरला आनंदाने बेभान होतो. आदित्यने आणलेल्या कागदांवर सह्या करण्यासाठी तो आसुलेला असतो. सागर सही करणार का, आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून सागरवर लावलेला निशाणा सावनी साधेल का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळतील.