एक्स्प्लोर
प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज बेपत्ता!

मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात नवं वळण आलं आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज बेपत्ता आहे. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
पोलिसांचं पथक राहुलला शोधण्यासाठी त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेलं होतं. पण घराला कुलूप होतं. पोलिसांनी राहुल राजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. शिवाय त्याचा फोनही स्विच ऑफ आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पोलिसांना राहुल राजची चौकशी करायची आहे आणि त्याला अटकही होऊ शकते, असं वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितलं.
राहुल राजने सत्र कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर राहुल बेपत्ता झाला आणि त्याचा फोनही स्विच ऑफ झाला आहे.
प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती
संबंधित बातम्या
प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन होतं : राहुल राज
आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता : डॉक्टर
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा
प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची ‘ती’ मुलाखत!
‘प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे’
आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?
प्रत्युषानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता : सारा खान
प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
प्रत्युषाच्या विम्यावर राहुलने जबरदस्तीने स्वत:चं नाव लिहिलं होतं : राखी
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























