Prajaktta Mali : ‘रान बाजार’ची ‘रत्ना’ साकारण्यासाठी प्राजक्ता माळीने वाढवलेलं ‘इतकं’ वजन!
Raan Baazaar : ‘रान बाजार’ या सीरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सीरीजमध्ये प्राजक्ताने ‘रत्ना’ नावाचे पात्र साकारले आहे.
Raan Baazaar : 'रान बाजार' (Raan baazaar) ही वेब सीरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सीरीजमधील भूमिकेमुळे सध्या या दोघींनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या वजनाची चर्चा सुरु आहे.
‘रान बाजार’ या सीरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सीरीजमध्ये प्राजक्ताने ‘रत्ना’ नावाचे पात्र साकारले आहे. वारांगणा असलेली रत्ना साकारण्यासाठी प्राजक्ताने प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘रत्ना’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्राजक्ताने अभिनयापासून ते देहबोलीपर्यंत सगळ्याचाच बारकाईने अभ्यास केला. या भूमिकेसाठी तिला स्वतःचे वजन देखील वाढवावे लागले होते. प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.
पाहा पोस्ट :
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती दोन वेगवेगळ्या अवतारात दिसत आहे. एकीकडे तिने साकारलेली रत्ना आहे, तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यातील प्राजक्ता. ‘रत्ना’ या भूमिकेसाठी आपण तब्बल 11 किलो वजन वाढवल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. रत्नाच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने 61 किलो इतकं वजन वाढवलं होतं. आता चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ती परत एकदा आपल्या मूळ वजनात येण्यासाठी मेहनत घेत आहे. नैसर्गिकरीत्या तिने वजन वाढवले होते आणि आता ती पुन्हा एकदा वर्क आउट करून वजन कमी करत आहे. अभिनेत्री म्हटलं की वाढत्या वजनाची काळजी घेणं हे ओघाने आलंच. मात्र, केवळ भूमिकेची गरज म्हणून प्राजक्ताने इतकं वजन वाढवलं. तिने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून, चाहते देखील तिचे खूप कौतुक करत आहेत.
ट्रोलर्सची बोलती केली बंद!
'रान बाजार' या वेब सीरीजमध्ये प्राजक्ता खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या बोल्ड अवतारामुळे तिच्यावर नेटकरी टीका करत आहेत. दरम्यान प्राजक्ताने यासंपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे.
प्राजक्ताने लिहिले की, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात, अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून मी हा प्रयत्न केला आहे. तिचे हे उत्तर ऐकून ट्रोलर्सची बोलती मात्र बंद झाली आहे.
संबंधित बातम्या