(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lock Upp Fees: निशा रावल ते मुनव्वर फारूकी; कंगनाच्या लॉक-अप शोमधील कलाकारांचे मानधन माहितीये?
लॉकअप (Lock Upp Show) शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही करते. या शोमधील स्पर्धक या शोसाठी किती मानधन घेत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील लॉकअप (Lock Upp Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही करते. या शोमधील स्पर्धक या शोसाठी किती मानधन घेत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात स्पर्धकांच्या मानधनाबाबत....
मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui)
मुनव्वर फारूकीसा या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या लॉक-अपमधील त्याच्या आणि अंजली अरोराच्या बॉडिंला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिपोर्टनुसार मुनव्वरला या शोच्या एका एपिसोडचे 3 से 3.5 लाख रुपये मानधन मिळते.
पूनम पांडे (Poonam Pandey)
अभिनेत्री पूनम पांडे या शोसाठी तील लाख रूपये मानधन घेते. नशा या चित्रपटामुळे पूनमला लोकप्रियता मिळाली, या शोमध्ये सध्या पूनम प्रेक्षकांना वेगवेगळे आणि अजब असे प्रॉमिस करताना दिसतो.
अंजली आरोरा (Anjali Arora)
कच्चा बदाम या व्हायरल गाण्यावर डान्स करून विशेष लोकप्रियता मिळवणारी अंजली आरोरा ही सोशल मीडिया इन्फ्लूअँसर आहे. रिपोर्टनुसार, अंजली ही लॉक-अप शोमध्ये काम करण्यासाठी तीन ते चर लाख फी घेते.
करणवीर बोहरा (Karanvir Bohra)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरानं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लॉक-अप शोच्या एक अठवड्यासाठी करणवीर दोन लाख मानधन घेतो.
निशा रावल (Nisha Rawal)
निशा रावल तिच्या एक्स पती अभिनेता करण मेहरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. लॉक-अप शोच्या एका आठवड्याचे 1.75 लाख ते दोन लाख मानधन निशा घेते.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha