Celebrity MasterChef : निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी एकत्र, 'या' कार्यक्रमात दोघींमुळे लागणार 'फोडणी'; निमित्त काय?
Celebrity MasterChef : बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.
Celebrity MasterChef : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पहिल्या सीझनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) दिसल्या होत्या. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) चर्चेत आली. आता या दोघीहीजणी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी सोनी टिव्हीवरील सेलिब्रेटी मास्टरशेफमध्ये (Celebrity MasterChef) एकत्र दिसणार आहेत. आता या दोघींमुळे कार्यक्रमाला फोडणी लागणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
या सेलिब्रेटी मास्टर शेफ कार्यक्रमाच्या सूत्रसंचलानाची जबाबदारी फराह खानही आहे. त्याचप्रमाणे शेफ रणवीर बरारही दिसणार आहे. अनेक ओळखीचे चेहरे या कार्यक्रमात दिसतील. नुकताच वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णीही सहभागी आहेत. त्यामुळे आता या कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर
सोनी टिव्हीवर नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. फराह खान म्हणते की, खर्सी की पेटी बांध लिजिए...आज आपण जाणार आहोत, अलास्काच्या बर्फाळ प्रदेशात... त्यानंतर शेफ रणवीर बरार म्हणतो की, पण लक्षात ठेवा इथे बर्फ जमूही द्यायचा नाहीये आणि तो विरघळवायचा देखील नाहीये...आजपर्यंत ज्यांना बघून लोकं शिट्ट्या वाजवत होते, आता त्या सगळ्यांची शिट्टी वाजणार...
हे कलाकार दिसणार सेलिब्रेटी मास्टरशेफमध्ये...
या कार्यक्रमात 'अनुपमा' फेम गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अडातिया, फैसल मलिक, दीपिका कक्कर, उषा नाडकर्णी आणि कविता सिंह यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. हा शो लवकरच सोनी टीव्हीवर येणार आहे. अद्याप या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंत अगदी सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मास्टरशेफमध्ये आता कलाकारांची शिट्टी वाजणार आहे. त्यामुळे यामध्ये कशी फोडणी लागते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram