Megha Dhade : 'या आगाऊ कार्टीला...', जान्हवी किल्लेकरवर मेघा धाडे संतापली; वर्षाताईंसाठी प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती
Megha Dhade : जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या वादावर अभिनेत्री मेघा धाडे हिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Megha Dhade Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi new season) घरात वाद आता काही नवीन राहिलेला नाही. दररोज कुणाचं ना कुणाचंतरी भांड्याला भांडलं लागतच आहे. त्यातच पहिल्या आठवड्यात निक्की आणि वर्षा उसगांवकर यांचा राडा झाल्यानंतर रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या राड्याची चर्चा झाली. याच राड्यावर मेघा धाडेची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
मेघा धाडे ही बिग बॉसच्या पहिल्या सिझनची विजेती होती. त्यामुळे ती देखील या बिग बॉसच्या घरात राहून आलेली आहे. म्हणूनच घरातील सदस्यांच्या वागणुकीवर तिने केलेली टीप्पणी ही विशेष चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या वादामध्ये तिने त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी केलेल्या भाषेवरही मेघाने तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.
मेघा धाडेने काय म्हटलं?
मेघाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी ही नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका, तिला बाहेरचा रस्ता दाखवा, ही माझी कळकळीची विनंती आहे.'
मेघाने रितेशला केली विनंती
मेघाने सलमान खानच्या त्या कृतीचा हवाला देत म्हटलं की, 'मला आठवतंय सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओमला त्यांच्या अशाच वागण्यामुळे घराच्या बाहेर हकललं होतं. आम्ही जान्हवीच्या विरोधातही अशीच काहीतरी अॅक्शन घेतली जाईल अशी अपेक्षा करतोय. रितेश देशमुख सर प्लीज तुम्ही जान्हवीली घराच्या बाहेर हाकलून द्या. बिग बॉसच्या घरात ही अशी लोकं नको, ही माझी कळकळीची विनंती आहे. '
जान्हवीच्या बोलण्याची मेघाने घेतली शाळा
जान्हवीने वर्षा उसगांवकर यांच्या पुरस्कारांवर भाष्य करताना म्हटलं की, 'महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार ह्यावर ह्या पद्धतीने भाषेचा वापर झालेला आहे, त्याबाबत आज मान शरमेने खाली गेली आहे. वर्षा ताई कलर्स मराठीने तुम्हाला फक्त अपमान करण्यासाठी या शोमध्ये आणलं आहे, असं वाटतंय हेच पुरस्कार मिळवण्यासाठी कित्येकांची हयात जाते.'
जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये नेमकं काय झालं?
जान्हवी आणि वर्षाताईंमध्ये वाद सुरु असताना जान्हवी त्यांना म्हणते की, ही घाणेरडी अॅक्टिंग माझ्यासमोर करु नका.त्यावर वर्षाताई म्हणतात की, असं कसं शासनाचा अभिनयासाठी मला पुरस्कार मिळाला आहे. त्यावर जान्हवी म्हणते की,आता त्यांना पश्चाताप होत असेल की, आपण ह्यांना का दिला पुरस्कार. किती चांगले चांगले कलाकार बाहेर आहेत. जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या वादावर सध्या जान्हवीवर नेटकरी चांगलेच संतापले असल्याचं पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा :