Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज, म्हणाले...
'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.
Majhi Tujhi Reshimgath : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये परीची भूमिका मायरा वायकुळने (Mayra Vaikul) साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.
कलाकरांनी शेअर केल्या पोस्ट
मालिकेतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मालिकेच्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. प्रार्थनानं 'अभी ना जाओ छोडकर' या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं श्रेयससोबतचे फोटो शेअर करुन त्याला भावनिक कॅप्शन दिलं. मायरानं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर प्रेक्षकांचे आभार मानले. या कलाकारांच्या पोस्टला चाहत्यांनी कमेंट्स करुन 'ही मालिका का बंद करत आहात?' असा प्रश्न विचारला आहे.
चाहत्यांच्या कमेंट्स
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद होत असल्यानं या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत. एका नेटकऱ्यानं संकर्षणच्या पोस्टला कमेंट केली,'खूप लवकर संपवली सिरीयल तुम्ही नेहा आणि यश या दोघांबद्दल काही दाखवलं पण नाही.' तर मायरानं शेअर केलेल्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, 'ही मालिका का बंद करत आहेत? आम्ही परीला खूप मिस करु'.
View this post on Instagram
नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं नाव 'दार उघड बये' असं आहे. दार उघड बये या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. तसेच या मालिकेचे कथानकही हटके असणार आहे, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: