एक्स्प्लोर

Marathi Serial: वादळवाट ते उंच माझा झोका; 'या' मराठी मालिकांचे टायटल साँग्स आजही आवडीने ऐकले जातात

जाणून घेऊयात मराठी मालिकांच्या टायटल साँग्सबद्दल...

Marathi Serial: मराठी मालिका लोक आवडीनं बघतात. या मालिकांचे कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा या गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. मराठी मालिकांच्या आगामी एपिसोड्समध्ये काय होणार? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. मराठी मालिकेचे टायटल साँग्स देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. जाणून घेऊयात मराठी मालिकांच्या टायटल साँग्सबद्दल...

वादळवाट (Vadalvaat)

वादळवाट ही मालिका 2003 ते 2007 यादरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या टायटल साँगनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. देवकी पंडित यांनी वादळवाट या मालिकेचं  टायटल साँग गायलं होतं.  तर या गाण्याचे गीतकार मंगेश कुळकर्णी हे होते.  वादळवाट या मालिकेच्या टायटल साँगला अशोक पत्की यांनी संगीत दिलं होतं.अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे या कलाकारांनी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

या सुखांनो या (Ya Sukhanno Ya)

या सुखांनो या या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षक आजही आवडीनं ऐकतात. 

होणार सून मी या घरची ( Honaar Soon Mee Hyaa Gharchi)

अनेक विवाह सोहळ्यांमध्ये तसेच संगीत कार्यक्रमात होणार सून मी या घरची या मालिकेचं टायटल साँग तुम्ही ऐकत असाल. नववधु या टायटल साँगवर डान्स देखील करतात. तेजश्री प्रधान, शशांक केतकर, रोहिणी हट्टंगडी यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.

माझा होशील ना (Majha Hoshil Na)

अशोक पत्की यांनी माझा होशील ना  (Majha Hoshil Na) या मालिकेच्या टायटल साँगला संगीत दिलं आहे. आर्या आंबेकरनं हे टायटल साँग गायलं आहे. या मालिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारली. 

जुळून येती रेशीमगाठी (Julun Yeti Reshimgathi)

जुळून येती रेशीमगाठी  (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेचं टायटल साँग स्वप्नील बांदोडकरनं (Swapnil Bandodkar) हे गायलं आहे. या मालिकेत प्रजाक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी प्रमुख भूमिका साकारली.

सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या  आई कुठे काय करते, तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) आणि रंग माझा वेगळा या मालिकांच्या टायटल साँग्सला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' मधील 'ही' अभिनेत्री आहे लेखिका; हिट मालिकांचं केलंय संवाद लेखन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget