Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Ashok Saraf : कर्तृत्वानुसार प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करता येतं, तिथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो : अशोक सराफ


Ashok Saraf : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी या सिनेमाबद्दल व्यक्त होत आहेत. बहुतांश प्रेक्षकांची मतं स्त्रियांना 'स्त्री' म्हणून सॉफ्ट कॉर्नर मिळतो, पुरुषांना मात्र व्यक्त होता येत नाही किंवा अन्याय झाला तरी ते मुकाट्याने सर्व सहन करावं लागतं,  अशा प्रकारची असतात. यासंदर्भात मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मात्र थोडं वेगळं मत व्यक्त केलं आहे.



Kon Honar Crorepati: भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आजचा भाग होणार संगीतमय!


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग विशेष असणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भीमराव पांचाळे  (Bhimrao Panchale) आणि प्रियंका बर्वे (Priyanka Barve) हजेरी लावणार आहेत. 



Historical Serial: स्वामिनी ते लोकमान्य; 'या' ऐतिहासिक मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं


Historical Serial: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ऐतिहासिक घटनांवर तसेच इतिहासावर आधारित असणाऱ्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकांमध्ये इतिहासामध्ये घडलेल्या विविध घटना दाखवण्यात आल्या. जाणून घेऊयात अशा ऐतिसाहसिक मालिकांबद्दल...



Baipan Bhaari Deva : 105 वर्षाच्या आजीनेही पाहिला 'बाईपण भारी देवा'; व्हिडीओ शेअर करत केदार शिंदे म्हणाले,"आजी रॉक्स"


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली आहे. सर्व वयोगटातील महिला आवडीने हा सिनेमा पाहायला जात आहेत. आता 105 वर्षाच्या आजीनेही 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहिला आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.



Premachi Gosht : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा प्रोमो आऊट; नेटकरी म्हणाले,"ये है मोहोब्बतें'चा रिमेक


Premachi Gosht : मालिकाविश्नात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गेल्या काही दिवसांत टीआरपीमुळे अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा