Baipan Bhaari Deva :'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 25 दिवस पूर्ण झाले असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर हा सिनेमा दिवसेंदिवस चांगलीच कमाई करत आहे. एकीकडे 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) सारखे हॉलिवूड सिनेमे धमाका करत असताना 'बाईपण भारी देवा'देखील चांगली कमाई करत आहे. 

'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मराठी सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने (Baipan Bhari Deva Opning Day Collection) 1.5 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात 12.4 कोटींची कमाई केली. दुसरा आठवडा 24.95 कोटी आणि तिसरा आठवडा 21.24 कोटींची कमाई केली. रिलीजच्या 25 दिवसांत या सिनेमाने 66.61 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'बाईपण भारी देवा'ची वाटलाच 100 कोटींच्या दिशेने

'बाईपण भारी देवा'ने रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. लवकरच हा सिनेमा रितेश देशमुखच्या 'वेड' आणि नागराज मंजुळेच्या 'सैराट'चा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. अनेक प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या रिलीजआधीच प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता पहायला मिळाली होती. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती आणि आता याच अपेक्षेवर खरं उतरत या सिनेमाने केवळ 25 दिवसांत केलेली 66.61 कोटींची कमाई केली आहे. 

'बाईपण भारी देवा'च्या कलेक्शनचं चित्र पाहता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिली असल्याची चर्चा रंगलेली दिसत आहे. नऊवारी साडी आणि गॉगल लावून अनेक महिला सिनेमा पाहताना दिसत आहेत. महिलांसह तरुण आणि पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहेत. सर्व वयोगटातील महिलांना हा सिनेमा भावला आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'बाईपण भारी देवा'!

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सांभाळली आहे. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection)

DAYCOLLECTION
पहिला दिवस1.5 कोटी
दुसरा दिवस2.2 कोटी
तिसरा दिवस3.2 कोटी
चौथा दिवस1 कोटी
पाचवा दिवस1.45 कोटी
सहावा दिवस1.8 कोटी
सातवा दिवस1.6 कोटी
आठवा दिवस2.35 कोटी
नववा दिवस5.4 कोटी
अकरावा दिवस2.78 कोटी
बारावा दिवस2.88 कोटी
तेरावा दिवस2.7 कोटी
चौदावा दिवस2.79 कोटी
पंधरावा दिवस2.6 कोटी
सोळावा दिवस5.15 कोटी
सतरावा दिवस5.75 कोटी
अठरावा दिवस2.2 कोटी 
एकोणिसावा दिवस2.1 कोटी
विसावा दिवस2 कोटी
एकविसावा दिवस 1.44 कोटी
बावीसावा दिवस1.20 कोटी
तेवीसावा दिवस2.46 कोटी
चोवीसावा दिवस3.36 कोटी
पंचवीसावा दिवस 1 कोटी

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : होऊ दे खर्च... सिनेमा आहे घरचा; चारचौघींनी सुपरहिट केलाय 'बाईपण भारी देवा'