Historical Serial: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ऐतिहासिक घटनांवर तसेच इतिहासावर आधारित असणाऱ्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकांमध्ये इतिहासामध्ये घडलेल्या विविध घटना दाखवण्यात आल्या. जाणून घेऊयात अशा ऐतिसाहसिक मालिकांबद्दल...
राजा शिवछत्रपती (Raja Shivchhatrapati)
राजा शिवछत्रपती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. ही मालिका 2008-09 या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील प्रसंग, मालिकेतील भव्य दिव्स सेट, कलाकारांचा अभिनय, मालिकेचं टायटल साँग या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली.
उंच माझा झोका (Unch Majha Zoka)
रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या उंच माझा झोका (Unch Majha Zoka) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत स्पृहा जोशी, तेजश्री वालावलकर, विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
स्वामिनी (Swamini)
स्वामिनी ही मालिका 2019-2020 च्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित होती. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. या मालिकेत ऐश्वर्या नारकरनं गोपिकाबाईंची भूमिका साकारली होती.
स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji)
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'लोकमान्य' (Lokmanya)
'लोकमान्य' (Lokmanya) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत क्षितिज दाते यानं बाळ गंगाधर टिळक यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या