Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग विशेष असणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुमित राघवन (Sumeet Raghavan) आणि चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) हजेरी लावणार आहेत. 


'कोण होणार करोडपती' विशेष भागात या आठवड्यात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.


सुमित राघवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजात 'कोण होणार करोडपती' या विशेष भागाची सुरवात केली. या विशेष भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांनी त्यांना समाजाप्रती असलेल्या भावना आणि विषय या मंचावर मांडले. चिन्मयी सुमित यावेळी मराठी शाळांबद्दल व्यक्त झाल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच का दाखल केले याबद्दल त्या म्हणाल्या.






सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे नेहमी चर्चेचा विषय असलेली जोडी आता 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर येत आहे. यावेळी सचिन खेडेकरांसोबत त्यांच्या कमाल गप्पा रंगल्या. सुमित राघवनच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात झाली त्यानंतर नर्मदा नवनिर्माण अभियान यांचासाठी  हा करोडपतीचा खेळ सुमित आणि चिन्मयी खेळणार आहेत.


सचिन खेडेकरांसोबत चिन्मय आणि सुमित यांच्या सुंदर गप्पा रंगल्या. सुमित आणि चिन्मयीची भेट कशी झाली त्यांनी त्यांच्या करियरची सुरवात कशी केली याबद्दल धमाल किस्से आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळणार आहेत. मराठी शाळांचे महत्व यावेळी सुमित आणि चिन्मयी यांनी पटवून दिले. मराठी शाळा टिकवणे किती महत्वाच्या आहेत याबद्दल ते बोलले.


'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग कधी रंगणार?


नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राऊंड परर्फोमन्स करणारी सुमित आणि चिन्मयी यांच्या जोडीचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग 22 जुलै रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेत. आता नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


संबंधित बातम्या


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हास्यसम्राट जॉनी लिव्हरची हजेरी; रंगणार विशेष भाग