Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली आहे. सर्व वयोगटातील महिला आवडीने हा सिनेमा पाहायला जात आहेत. आता 105 वर्षाच्या आजीनेही 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहिला आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


केदार शिंदेंनी सोशल मीडियावर 105 वर्षाच्या आजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आजी 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा त्यांना कसा वाटला हे सांगताना दिसत आहेत. आजी म्हणाल्या,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा खूप आवडला. म्हाला माझा आशीर्वाद. तुम्ही खूप खूप मोठे व्हा आणि असेच पुढे जात राहा". आजीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






केदार शिंदेंनी आजीचा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. आणखीन काय हवंय आयुष्यात? वय वर्षे 105.. थिएटर मध्ये येऊन सिनेमा पाहिला. आणि त्याची प्रतिक्रिया सुध्दा कळवली. आजी रॉक्स". केदार शिंदेंच्या या पोस्टवर हेचं खरं बक्षीस, हेच प्रेम, आर्शिर्वाद, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'बाईपण भारी देवा'


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Guppe), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. 


'बाईपण भारी देवा'च्या कलेक्शनचं चित्र पाहता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिली असल्याची चर्चा रंगलेली दिसत आहे. नऊवारी साडी आणि गॉगल लावून अनेक महिला सिनेमा पाहताना दिसत आहेत. महिलांसह तरुण आणि पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहेत. सर्व वयोगटातील महिलांना हा सिनेमा भावला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची 25 दिवसांत 66.61 कोटींची भरारी! लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा