एक्स्प्लोर

Telly Masala : पूजा सावंतनं शेअर केला जोडीदारासोबतचा फोटो ते 'लंडन मिसळ'चा ट्रेलर रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Pooja Sawant : सांग जरा असे कसे लपायचे रे आताsss पूजा सावंतचा होणारा नवरा कोण?

Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आज वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिचा होणारा पती कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

London Misal Trailer : फुल टू धमाल... भरत जाधव, गौरव मोरेच्या 'लंडन मिसळ'चा ट्रेलर रिलीज

London Misal : 'लंडन मिसळ' (London Misal) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. फुल टू धमाल असणाऱ्या भरत जाधव (Bharat Jadhav) आणि गौरव मोरे (Gaurav More) यांच्या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pooja Sawant Engaged : पूजा सावंतच्या मनाचा धागा जुळला, जोडीदारासोबतचा फोटो शेअर, मोठी घोषणा

Pooja Sawant : 'कलरफुल' पूजा सावंत (Pooja Sawant) कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण आता अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2 : बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'चा जलवा! चार दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई

Jhimma 2 Box Office Collection Day 4 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. एकीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शित झालेला असताना 'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. 'झिम्मा 2' या सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने पाच कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kosala Movie : भालचंद्र नेमाडे लिखित 'कोसला' आता झळकणार पडद्यावर; 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस' चित्रपटाची घोषणा

Kosala Movie :  भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) लिखित 'कोसला' (Kosala) या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस...' या चित्रपटाची एका भव्य सोहळयात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होते. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
×
Embed widget