एक्स्प्लोर

Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांच्या भाषणात 'त्या' दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख, 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत?

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या भाषणांनी मैदानं गाजवत आहेत. या सगळ्या प्रचारात महायुतीकडून 'लाडकी बहीण योजने'चे (Ladki Bahin Yojana) 1500 रुपये आणि 'बटेंगे तो कटेंगे' (Batenge to Katenge) या दोन मुद्द्यांवर विशेष भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण योजना' ही गेमचेंजर ठरेल, अशी चर्चा होती. तर भाजपची (BJP) 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा हिंदू मतांचे ध्रुवीकरण घडवून आणेल, असा महायुतीचा कयास होता.  हीच गोष्ट लक्षात घेऊन महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा आणि खंदा आधार असलेले शरद पवार (Sharad Pawar) 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'च्या आधारे महायुतीकडून सुरु असलेल्या वातावरणनिर्मितीला छेदण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महायुतीकडून या दोन नरेटिव्हच्या आधारे मतदारांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे, ते शरद पवार सातत्याने खोडून काढताना दिसत आहेत. 

शरद पवार यांची अलीकडच्या काही सभांमधील भाषणं पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येऊ शकते. शरद पवार आपल्या सभांमध्ये सातत्याने 'लाडकी बहीण योजने'बाबत बोलत आहेत. राज्य सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे, या गोष्टीचा आनंद आहे. मात्र, या पैशांपेक्षा राज्यातील महिलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे शरद पवार सातत्याने सांगत आहेत. यासाठी शरद पवार हे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणासह गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारी मांडताना दिसत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर 67,381 महिलांवर अत्याचार झाले. दररोज पाच स्त्रियांवर अत्याचार होतात. महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 64 हजार महिला बेपत्ता झाल्या. सरकार एका बाजूला सांगत होते लाडकी बहीण. एका बाजूला 1500 द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला हजारो स्त्रिया बेपत्ता व्हायच्या, हे पाप यांच्या काळात झाले, असे शरद पवार आपल्या भाषणांमध्ये सातत्याने सांगताना दिसत आहेत. 

पुण्यातील विशिष्ट भागात भाजपला एकगठ्ठा मतदान होतं, त्याला आम्ही व्होट जिहाद म्हणत नाही: शरद पवार

भाजपकडून जातीच्या आधारावर होणारे मतविभाजन टाळण्यासाठी 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सैफ है' या घोषणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. यावरही शरद पवार हे पुण्यातील मतदानाच्या पॅटर्नचे उदाहरण देत 'व्होट जिहाद'चे नरेटिव्ह खोडून काढताना दिसत आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पुण्याच्या काही भागांमध्ये एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला मतदान केलं, आम्हाला त्याची सवय आहे. इथे असंच मतदान होतं, हे आम्हाला माहिती आहे. अमुक ठिकाणी अमुक होईल, असे आम्ही गृहीत धरलेले असते. याचा अर्थ त्याला तुम्ही 'व्होट जिहाद' समजत नाही. 'व्होट जिहाद' हा शब्द वापरुन विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आमचा त्याला विरोध आहे, असे शरद पवार यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

आणखी वाचा

शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget