Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर यांना चाहतीनं दिलं खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, 'मन इतकं भरून येतं...'
एका चाहतीनं दिलेल्या गिफ्टचा व्हिडीओ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Madhurani Prabhulkar: अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मधुराणी या आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारतात. त्यांच्या या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मधुराणी यांना अनेक चाहते विविध गिफ्ट्स पाठवत असतात. मधुराणी यांच्या एका चाहतीनं नुकतेच एक खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मधुराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक पेंटिंग दिसत आहे. हे पेंटिंग एका चाहतीनं मधुराणी यांना पाठवलं आहे. या पेंटिंगचा व्हिडीओ शेअर करुन मधुराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं,'इतक्या प्रेमाने इतकं सुंदर painting कुणी करून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की, पाणी डोळयातून वाहून जातं. शिल्पा पवार या कलावतीचे खूप खूप आभार. आणि उदंड प्रेम'
मधुराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या पेंटिंगच्या मागे एक कविता लिहिलेली आहे. व्हिडीओमध्ये मधुराणी ही कविता वाचून दाखवताना दिसत आहेत. मधुराणी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'तुम्ही तुमच्या अभिनयाने मनं जिंकता. ताई म्हणून फॅन्स देखील तुमच्यावर मनापासुन प्रेम करतात', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं मधुराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर केली.
मधुराणी यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या: