
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या नारकरनं दिली उत्तरं ते ‘खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमामध्ये सुबोध भावे लावणार हजेरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Aishwarya Narkar: 'खरं नाव का नाही लावत?' ते 'तुमच्या कपाळावर काय झालंय?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या नारकरनं दिली उत्तरं
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्यानं नुकतेच Ask Me A Question हे सेशन इन्स्टाग्रामवर केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची ऐश्वर्यानं उत्तरं दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Happy Birthday Mahesh Manjrekar : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अन् बरचं काही...मराठी मनोरंजनसृष्टीत दहशत असणाऱ्या महेश मांजरेकरांना पहिला ब्रेक कसा मिळाला? जाणून घ्या...
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे नाव घेतलं तरी मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींची दातखिळी बसते. मनोरंजन विश्वात 'महेश मांजरेकर' या नावाचा दरारा आहे. अभिनेते (Actor), दिग्दर्शक (Director), निर्माते (Producer) अशा वेगवेगळ्या भूमिका लिलया पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar Birthday) आज वाढदिवस आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pooja Sawant: कसा जोडीदार पाहिजे? पूजा सावंत म्हणते, 'मला असा पार्टनर पाहिजे जो...'
Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पूजानं नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पूजानं 'कसा जोडीदार पाहिजे?' या प्रश्नाचं उत्तर दिलं. पूजानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kedar Shinde: "टोमणा मारून ते मला काहीतरी बोललेच..."; केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केदार शिंदे हे सध्या या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच केदार शिंदे यांनी अशोक मुळे यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुबोध भावे देणार उत्तरं; ‘खुपते तिथे गुप्ते'चा प्रोमो व्हायरल
Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये कलाकार, राजकीय नेते हजेरी लावतात. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना दिसणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत हा सुबोधला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
