Telly Masala : तेजश्री प्रधानची नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस ते बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान नव्या मालिकेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेत्रीनं खास व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच तेजश्रीची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेबद्दल तेजश्रीनं एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे.
Baipan Bhaari Deva: ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं या बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं कौतुक; शेअर केली खास पोस्ट
Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी 'बाई पण भारी देवा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 'बाई पण भारी देवा' चित्रपटामधील या अभिनेत्रींच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आता नुकतीच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर करुन 'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Sagar Talashikar: अभिनेते सागर तळाशीकर तब्बल पाच तास अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “भयंकर आहे हे”
Sagar Talashikar: पुण्यातील (Pune) वाहतूक कोंडीमध्ये अनेकजण अडकतात. विविध कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असते. अनेक सेलिब्रिटी तसेच नागरिक सोशल मीडियावरील पोस्ट शेअर करुन या वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त करतात. नुकाताच अभिनेते सागर तळाशीकर (Sagar Talashikar) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांची 85 वर्षांची आई आणि ते हे तब्बल पाच तास पुण्यातील वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. सागर तळाशीकर यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या सेटवर दिसला बिबट्या; व्हिडीओ व्हायरल
Sukh Mhanje Nakki Kay Asta: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील फिल्मसिटीमध्ये बिबट्या दिसल्याची घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वी 'अजूनी' या मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला होता. आता "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला आहे. बुधवारी (26 जुलै) एक बिबट्या त्याच्या पिल्लासह "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या सेटवर फिरताना दिसला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवर या बिबट्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
SPY OTT Release: 'कार्तिकेय 2' फेम अभिनेता निखिल सिद्धार्थचा 'स्पाय' ओटीटीवर झाला रिलीज; कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...
SPY OTT Release: अभिनेता निखिल सिद्धार्थच्या (Nikhil Siddhartha) 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कार्तिकेय 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पण 2023 मध्ये रिलीज झालेला त्याचा 'स्पाय' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. आता निखिलचा 'स्पाय' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकणार आहेत. 'स्पाय' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात...