SPY OTT Release: 'कार्तिकेय 2' फेम अभिनेता निखिल सिद्धार्थचा 'स्पाय' ओटीटीवर झाला रिलीज; कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...
SPY OTT Release: 'स्पाय' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात...
SPY OTT Release: अभिनेता निखिल सिद्धार्थच्या (Nikhil Siddhartha) 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कार्तिकेय 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पण 2023 मध्ये रिलीज झालेला त्याचा 'स्पाय' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. आता निखिलचा 'स्पाय' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकणार आहेत. 'स्पाय' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे? याबाबत जाणून घेऊयात...
गॅरी बीएच दिग्दर्शित स्पाय या चित्रपटात जय वर्धन या रॉ एजंटची कथा दाखवण्यात आली आहे. स्पाय हा चित्रपट प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रेक्षक पाहू शकणार आहेत. स्पाय हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. 28 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, असं म्हटलं जात आहे. जर तुम्हाला अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या वीकेंडला स्पाय हा निखिल सिद्धार्थचा चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहू शकता.
स्पाय चित्रपटाची स्टार कास्ट
स्पाय या चित्रपटात निखिल सिद्धार्थसोबतच ऐश्वर्या मेनन, अभिनव गोमतम, आर्यन राजेश, मकरंद देशपांडे, रवी वर्मा आणि सचिन खेडकर या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थनं रॉ एजंट असणाऱ्या जय वर्धनची भूमिका साकारली तर ऐश्वर्या मेनननं वैष्णवी ही भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
स्पाय चित्रपटाचं कथानक
स्पाय या चित्रपटाची कथा रॉ एजंट जय वर्धनवर आधारित आहे, जो त्याचे साथीदार कमल आणि वैष्णवी यांच्यासोबत एका मिशनवर गेला आहे. जय वर्धनचा मोठा भाऊ आणि रॉ एजंट सुभाष वर्धनची हत्या झाली आहे. जय वर्धनची टीम आता सुभाष वर्धनची हत्या करणाऱ्याला शोधत आहे. सुभाष वर्धनची हत्या करणाऱ्याला जय वर्धनची टीम शोधू शकते की नाही? या प्रश्नाचं उत्तर स्पाय या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Gadar 2 Trailer: 'गदर-2' च्या ट्रेलरनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'