Man Dhaga Dhaga Jodte Nava : 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मालिकेतील भूमिकांबाबत
‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका आजपासून (8 मे) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Man Dhaga Dhaga Jodte Nava : छोट्या पडद्यावरील नव्या मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका आजपासून (8 मे) , सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेतील भूमिकांबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात या मालिकेतील भूमिकांबाबत...
आनंदी
‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील आनंदी ही मायाळू, सहनशील, भोळू, देवावर श्रद्धा असणारी, जबाबदारी, कर्तव्याची जाण असणारी मुलगी आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’या मालिकेत आनंदीच्या आयुष्यात काय काय घडतं? हे बघायला मिळणार आहे.
View this post on Instagram
देवेंद्र सराफ
देवेंद्र सराफ हे आनंदीचे वडील आहेत. देवेंद्र सराफ यांना स्वयंपाकाची आवड आहे. देवेंद्र हे आपल्या कुटुंबावर प्रेम करतात. ते सरळ मार्गी चालत असतात.
View this post on Instagram
मालती सराफ
मालती सराफ या आनंदीच्या आई आहेत. त्या काटकसरी आहे. त्यांना संस्कृती जपायला आवडतं.
View this post on Instagram
सार्थक
सार्थक हा आपलं काम हेच सर्वस्व मानतो. तो स्पष्टवक्ता, कष्टाळू, वक्तशीर आणि नियमाने वागणारा आहे.
View this post on Instagram
त्याच बरोबर मनोज, लीना, सुधा, वृंदा, आकांक्षा, अरविंद, शलाका, आदर्श आणि केदार या भूमिका देखील तुम्हाला ‘मन धागा धागा जोडते नवा’ या नव्या मालिकेत बघायला मिळणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: