Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री; झळकणार 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीसोबत
Myra Vaikul : मायराने सोशल मीडियावर तिच्या 'नीरजा एक नई पहचान' (Neerja Ek Nayi Pehchaan) या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
Myra Vaikul New Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मायरा वैकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे. मराठी मालिका विश्व गाजवल्यानंतर मायरा आता हिंदी मालिकेत एन्ट्री करत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मायरा वैकुळ काय करते? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता मायराने सोशल मीडियावर तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. 'नीरजा एक नई पहचान' (Neerja Ek Nayi Pehchaan) असे तिच्या नव्या मालिकेचे नाव आहे.
मायराची नवी मालिका 'नीरजा एक नई पहचान' प्रेक्षक हिंदी कलर्स वाहिनीवर पाहू शकतात. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या मालिकेत मायरा वैकुळ आणि 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
'नीरजा एक नई पहचान' (Neerja Ek Nayi Pehchaan) या मालिकेच्या प्रोमोमध्ये मायराचा निरागस आणि हसरा चेहरा दिसत आहे. तिला लक्ष वेधून घेणारा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मायराच्या या व्हिडीओवर मराठमोळी अभिनेत्री आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मायराच्या आईची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरेनेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिलं आहे,"माझं बाळ खूप खूप अभिनंदन... मला तुझा खूप अभिमान वाटतो".
'नीरजा एक नई पहचान' या मालिकेचा प्रोमो शेअर करत मायराने लिहिलं आहे,"मायराच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. कलर्स वाहिनीने ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. पण या जगात फिरण्याची नीरजाला का बंदी आहे". मायराच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहे.
मायराची नवी मालिका 'नीरजा एक नई पहचान' आई-मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. नीरजाच्या आईला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण आपली लेक या सर्व गोष्टींपासून दूर राहावी यासाठी संघर्ष करणारी ही आई आहे. मायरा आणि स्नेहाची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या