Man Dhaga Dhaga Jodte Nava: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा पहिला एपिसोड कसा होता? नेटकरी म्हणाले...
नुकतीच सोशल मीडियावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली.
Man Dhaga Dhaga Jodte Nava : ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही नवी मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता बघू शकतात. नुकतीच सोशल मीडियावर या मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये नेटकऱ्यांना ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या पहिल्या एपिसोडबद्दल विचारण्यात आलं. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला? असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारण्यात आला आहे. या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रथम म्हणजे शिर्षक गीत उत्तम आहे.. कथानक छानच.. खूप छान वाटला पहिला भाग. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, छान होता,पण तेच रटाळ, रडगाण जे मुलगी झाली हो मध्ये बघत होतो,पल्लवी शुभाषची तीच अक्टिंग बघायला मिळणार कायम रडवेला चेहरा, नो चेंज, बाकी जोडी मस्त वाटते दोघांची' एका युझरनं कमेंट केली, 'सुरवात छान झाली आहे. कल्याण ते नाशिक प्रवासाची, आता आनंदीच्या पुढील आयुष्याचा प्रवास कसा असेल? याची उत्सुकता आहे. शुभेच्छा'
View this post on Instagram
‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेतील आनंदीची गोष्ट दाखवण्यात आली आहे.आनंदी ही मायाळू, सहनशील, भोळू, देवावर श्रद्धा असणारी, जबाबदारी, कर्तव्याची जाण असणारी मुलगी आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’या मालिकेत आनंदीच्या आयुष्यात काय काय घडतं? हे बघायला मिळणार आहे. त्याच बरोबर मनोज, लीना, सुधा, वृंदा, आकांक्षा, अरविंद, शलाका,सार्थक, आदर्श आणि केदार या भूमिका देखील तुम्हाला ‘मन धागा धागा जोडते नवा’ या नव्या मालिकेत बघायला मिळणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: