Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण; नेहा होणार आई?
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत एक ट्विस्ट आला आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. मालिकेत नेहा प्रेग्नंट असल्याची घरच्यांना चाहुल लागली आहे. त्यामुळे आता नेहा खरंच आई होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
नेहा खरचं आई होणार?
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यशमुळे नेहाचं जागरण होतं. जागरणामुळे नेहाला अॅसिडिटी होते. अॅसिडिटीमुळे नेहाला मळमळ, थकवा, उलट्या होत आहेत. पण घरच्यांना असं वाटत आहे की, नेहा प्रेग्नंट आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात घरातील सर्व मंडळी नेहाची खूप काळजी घेताना दिसून येणार आहेत. तसेच सिम्मी काकू नेहाला त्रास न देण्याचा परीला सल्ला देताना दिसून येणार आहेत.
View this post on Instagram
'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा 17 सप्टेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. पण मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकुळ (Mayra Vaikul) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेजागी आता 'दार उघड बये' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या