Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुलेनं अश्विनी भावेंना दिली 'लिंबू कलर' ची भेटवस्तू; गिफ्ट पाहून खळखळून हसाल
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी (Ashwini Bhave) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोमध्ये हजेरी लावली आहे.
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. या शोमध्ये अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी देखील हजेरी लावली आहे. अश्विनी भावे यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार समीर चौघुलेनं खाल गिफ्ट दिलं आहे.
समीर चौघुलेनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अश्विनी भावे यांना समीर चौघुलेनं लिंबू कलरचा पट्टा गिफ्ट म्हणून दिला. समीर चौघुलेचं हे गिफ्ट पाहून प्रेक्षक खळखळून हसले. गिफ्ट घेतल्यानंतर अश्विनी भावे या समीर चौघुलेला म्हणाल्या, 'समीर तू जसा लाजला, तितकं सुंदर मलाही लाजता येणार नाही' या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे, 'हास्याच्या मंचावर येणार प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार.' महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज‘, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अश्विनी भावे यांनी काम केलं आहे. इक्का राजा रानी, कायदा कानून, चौराह या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अश्विनी भावे यांनी काम केलं आहे. ’अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटामुळे अश्विनी भावे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील अशोक सराफ आणि अश्विनी भावे या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. या कार्यक्रमामध्ये विविध चित्रपटांच्या टीम हजेरी लावत असतात. या कार्यक्रमातील कलाकारांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtrachi Hasyajatra : सई ताम्हणकर आणि प्रसाद ओकनं हात जोडून मागितली माफी; पोस्टनं वेधलं लक्ष