Telly Masala : मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय ते 'कोण होणार करोडपाती' मध्ये प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपाती'मध्ये रंगभूमीचा हाऊसफुल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळणार
Kon Honar Crorepati : 'कोण होणार 'करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) हे हॉट सीटवर येणार आहेत.
Viral Video: 'काळी माती निळं पाणी हिरवं शिवार...'; शेतात काम करणारी 'ही' अभिनेत्री कोण? जाणून घ्या
Rashmi Anpat: अभिनेत्री रश्मी अनपट (Rashmi Anpat) ही विविध मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. रश्मी ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच रश्मीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात काम करताना दिसत आहे.
Vandana Gupte : राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं पोहोचवणं ते इस्त्रीवर पापड भाजणं; 'बाईपण भारी देवा'च्या प्रमोशनदरम्यान वंदना गुप्तेंनी सांगितल्या भन्नाट आठवणी
Vandana Gupte : मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या त्या जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे आणि शर्मिला यांच्याबद्दलचं एक गुफित उलगडलं आहे.
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय; संचालक पदाचा दिला राजीनामा
Madhurani prabhulkar : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी प्रभुलकर (Madhurani prabhulkar) घराघरांत पोहोचली आहे. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मधुराणीने मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
Sankarshan Karhade: नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून संकर्षण कर्हाडेनं जिंकली प्रेक्षकांची मनं; कधी कवी तर कधी दिग्दर्शक होऊन प्रेक्षकांचे केले मनोरंजन
Sankarshan Karhade: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कर्हाडे (Sankarshan Karhade) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संकर्षणनं अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तो कवी देखील आहे. अनेक वेळा संकर्षण त्यानं लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसमोर सादर करतो. संकर्षण हा अष्टपैलू कलाकार आहे असं म्हणता येईल, कारण संकर्षण हा कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक या भूमिका उत्तमपणे पार पडतो. जाणून घ्या संकर्षण कर्हाडेच्या नाटक, मालिका आणि चित्रपटांबद्दल...