एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : पत्नीसोबत सिनेमा पाहायचाय आ जाओ, दिखा देंगे; 'बाईपण भारी देवा'चं हटके प्रमोशन

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.

Baipan Bhaari Deva Marathi Movie Pramotion : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता हटके प्रमोशनमुळे हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

मराठी मनोरंजनसृष्टीला पडली रील स्टारर्सची भूरळ

'बाईपण भारी देवा' या आगामी मराठी सिनेमाचं प्रमोशन एका वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. 'आजाओ दिखा दुंगा' असं म्हणत रील्सच्या विश्वात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला प्रॉपर्टी गुरू भावेशच्या ट्रीकचा वापर करत 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं आहे.

भावेशचे रील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. बड्या सेलिब्रिटींसह फॉरेनर्सनीदेखील त्याचे रील बनवले आहेत. आता 'बाईपण भारी देवा' या सिनेमांनी भावेशच्या स्टाईलचा वापर कपत रील बनवले आहे. त्यांचे रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिनेमातील कलाकार म्हणत आहेत,"कॉलेजच्या मैत्रिणीसोबत सिनेमा पाहायचाय....आ जाओ, दिखा देंगे, हत्तीवर बसून सिनेमा बघणार...आ जाओ, दिखा देंगे, 'बाईपण भारी देवा' सिनेमा पाहायचाय...आ जाओ, दिखा देंगे". 

भावेश ज्या पद्धतीने नेटकऱ्यांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करतो अगदी त्याचप्रकारे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा करेल असं म्हटलं जात आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. 

'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 जून 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार आहे. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अशोक सराफ म्हणाले," सिनेमातील सहा अभिनेत्रींना एकत्रित पडद्यावर काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी आहे. या सगळ्या अभिनेत्रींनी आतापर्यंत जे उत्तम काम अभिनयात केलंय ते खूप मोठं आहे म्हणूनच मी देखील चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. बाईपण भारी देवा चित्रपट बॉक्सऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, लोकांना हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे."

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर रिलीज; रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुचित्रा बांदेकर प्रमुख भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget