(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vandana Gupte : राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं पोहोचवणं ते इस्त्रीवर पापड भाजणं; 'बाईपण भारी देवा'च्या प्रमोशनदरम्यान वंदना गुप्तेंनी सांगितल्या भन्नाट आठवणी
Vandana Gupte : राज ठाकरे आणि शर्मिला यांचे प्रेमपत्रं पोहोचवण्याचं काम वंदना गुप्ते यांनी केलं होतं.
Vandana Gupte : मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या त्या जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे आणि शर्मिला यांच्याबद्दलचं एक गुफित उलगडलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि वंदना गुप्ते हे दादरमधील शिवाजी पार्क परिसरात राहत असून त्यांचं खूप छान नातं आहे. शर्मिला ठाकरे या मोहन वाघ यांची कन्या आहेत. मोहन वाघ यांच्या अनेक नाटकांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केलं आहे. शर्मिला आणि वंदना एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.
वंदना गुप्ते नुकतचं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतील म्हणाल्या की,"राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्र एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं आहे. मोहन वाघ यांच्या नाटकांमध्ये मी काम केल्याने माझी आणि शर्मिलाची खूप चांगली मैत्री आहे".
वंदना गुप्तेंनी इस्त्रीवर भाजलेला पापड
'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी एक किस्सा शेअर केला आहे. त्या म्हणाल्या,"25 वर्षांपूर्वी अमेरिकेत जास्त शाकाहारी पदार्थ मिळत नसे. त्यावेळी आम्ही तिथे एका नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो होतो. दरम्यान मी सर्वांसाठी खिडची बनवायचं ठरवलं. पापडाशिवाय खिचडी पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे मी इस्त्रीवर एक कागद ठेवला आणि त्यावर इस्त्री फिरवून पापड भाजले".
'बाईपण भारी देवा'बद्दल जाणून घ्या...
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सर्वत्र या सिनेमाचं कौतुक होत आहे. केदार शिंदेंनी (Kedar Shinde) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर त्यांची लेक सना शिंदेने या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. तर शरद पोंक्षे आणि पियुष रानडे हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
संंबंधित बातम्या