Maharashtra Television News : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ते 'आई कुठे काय करते'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tuzech Mi Geet Gaat Aahe: विजय आणि क्षमा करतायत स्वराला समजावण्याचा प्रयत्न; स्वराज मल्हारला सांगेल का सत्य?
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमधील स्वराज उर्फ स्वरा ही मल्हारला सत्य सांगायला जाते. पण क्षमा, विजय हे स्वराला मल्हारसोबत बोलू देत नाहीत. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वरा ही विजय आणि क्षमावर चिडलेली दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगलने लक्ष्मीसाठी बांधला झोका; सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी मंगलची एन्ट्री झाली आहे. नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, लक्ष्मी मंगलला झोका बांधून द्यायला सांगते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sheezan Khan KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान दक्षिण आफ्रिकेत दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाला,"नवी सुरुवात..."
Sheezan Khan On Khatron Ke Khiladi 13 : टीका आणि आरोपांनंतर पुन्हा करिअर घडवण्याची संधी खूप कमी मंडळींना मिळते. अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शीझान खान (Sheezan Khan) पोलिसांच्या ताब्यात होता. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शीझानला लगेचच 'खतरों के खिलाडी 13'साठी (Khatron Ke Khiladi 13) विचारणा झाली आहे. शीझान आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मालिकेत नवा ट्वीस्ट; वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत सध्या ईशा आणि अनिषच्या लग्नाची गडबड सुरू आहे. दरम्यान मालिकेत आता अरुंधतीच्या नव्या नणंदेची एन्ट्री झाली आहे. वीणाच्या येण्याने मालिकेत नवा ट्वीस्ट आला आहे. आता मालिकेच्या आगामी भागात वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवताना दिसणार आहे.