Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या गाण्याच्या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दित आहे की, तू चाल पुढं हे गाणं 10 वर्षाचा संकल्प काळे गात आहे. संकल्प हा जालना येथील आहे. प्रोमोमध्ये पुढे दिसते की, संकल्प हा सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) यांच्यासमोर गाणं गातो. त्यानंतर सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' बाबत सांगतात. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' हा कार्यक्रम 10 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. आता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमात कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार आहे? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते की, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत.
View this post on Instagram
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाची विजेती शुद्धी कदम ही ठरली होती. या कार्यक्रमात राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: