Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगलने लक्ष्मीसाठी बांधला झोका; सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष
नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी मंगलची एन्ट्री झाली आहे. नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, लक्ष्मी मंगलला झोका बांधून द्यायला सांगते.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी आणि नंदिनी या आमरस बनवत आहेत. 'आई आणि माई आजी माझ्यासाठी आमरस बनवत आहेत, मला खूप आवडतो.' असं लक्ष्मी मंगलला सांगते. यावर मंगल म्हणते, 'हो, का मग मी पण बनवते.' नंतर लक्ष्मी म्हणते, 'नको, मला फक्त आईनं तयार आमरस खायचा आहे.'
मंगलनं लक्ष्मीसाठी बांधला झोका
प्रोमोमध्ये दिसत आहे की, लक्ष्मी मंगलला तिच्यासाठी झोका बांधून द्यायला सांगते. त्यानंतर मंगल ही लक्ष्मीसाठी झोका बांधते. मंगल जेव्हा झोका बांधत असते तेव्हा लक्ष्मीला तिच्या बालपणाचे किस्से सांगत असते. त्यानंतर मंगल आणि लक्ष्मी यांच्या गप्पा देवकी आणि शालिनी लपून ऐकत असतात.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मंगलची जेलमधून सुटका झाली. मंगल ही जवळपास 30 वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटका होताच मंगल ही शिर्केपाटील कुटुंबाच्या घरात आली.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील कलाकार
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मंगल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :