Aai Kuthe Kay Karte: डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा; पाहा 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्या सोहळा सुरु आहे. ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांच्या घरीच पार पडत आहेत. डान्स आणि गाण्यांनी ईशा आणि अनिषचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात यश हा ईशाबाबत बोलत आहे. यश हा ईशाचं कौतुक करतो. त्यामुळे ईशा भावूक होते. यश ईशाचा स्वभाव आणि ईशाचं प्रेम या सर्व गोष्टींबाबत अनिषला सांगतो. ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्यात अनिरुद्ध, अरुंधती आणि देशमुख कुटुंबानं डान्स केला.
View this post on Instagram
'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्यावरुन वाद झाला होता. ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा, असं अरुंधतीचं मत होतं. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं होते की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून आणि अरुंधतीमध्ये वाद झाला होता. आता ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांचा घरीच होत आहे.
ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी ईशा, अनिशची आई, कांचनताई, सुलेखाताई आणि अरुंधती या सगळ्या एका साडीच्या दुकानात गेल्या होत्या. या दुकानात ईशाला एक घागरा आवडतो. या घागऱ्याची किंमत 35 हजार आहे. हे ऐकून कांचनताई आणि अरुंधती आश्चर्यचकित होतात. पण तो घागरा ईशा खरेदी करते.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
इतर महत्वाच्या बातम्या: