Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते' ते 'तुझेच मी गीत गात आहे'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,"तू तीन मुलांची आई, अनिरुद्धसोबत 25 वर्षांचा संसार..."
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस यावी साठी निर्माते सतत नव-नवे ट्वीस्ट आणत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात वीणा अरुंधतीला तिच्या लव्हस्टोरीबद्दल विचारताना दिसणार आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वीणा अरुंधतीला तिच्या आणि आशुतोषच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारताना दिसत आहे. ती म्हणतेय,"तू तीन मुलांची आई आहेस आणि अनिरुद्धसोबत 25-26 वर्षांचा संसारही केलास". त्यानंतर अरुंधती वीणाचं बोलणं टाळताना दिसत आहे. ती म्हणतेय,"याविषयावर आपण नंतर कधीतरी बोलू".
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मल्हारसाठी गायलं गाणं; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. मल्हार हाच स्वराजचा बाबा आहे, हे आता स्वराजला सर्वांना सांगायचं आहे. स्वराज गेल्या काही दिवसांपासून हे मल्हारला सांगायचा प्रयत्न करत आहे. आता स्वराजनं मल्हारला एक गाणं गाऊन दाखवलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर मल्हारला खूप आनंद होतो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chala Hawa Yeu Dya : भारत गणेशपुरेंच्या नातवाची थुकरटवाडीत एन्ट्री! आजोबांसोबत आता नातूही हसवणार
Bharat Ganeshpure Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या नातवाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागापासून भारत गणेशपुरे या कार्यक्रमाचा भाग आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अल्पावधीतच घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख मिळाली आहे. आता याच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा नातू त्याच्या करिअरला सुरुवात करत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khatron ke khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पुन्हा दिसणार शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकची जोडी? निर्मात्यांची 'छोटा भाईजान'ला विचारणा
Shiv Thakare Abdu Rozik On Khatron Ke Khiladi : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाची सध्या चर्चा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू असून असून या पर्वात सहभागी होणारे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिकची (Abdu Rozik) जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aamhi Jato Amuchya Gava: 55 वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ चित्रपट घरबसल्या पहाण्याची प्रेक्षकांना संधी; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या...
दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, दगडी चाळ 2, बळी, कारखानिसांची वारी अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर आता प्रेक्षकांना 55 वर्षांपूर्वीचा एक चित्रपट पाहायला मिळणार आहे. 55 वर्षांपूर्वीचा आम्ही जातो आमुच्या गावा हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटातील देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, मला हे दत्तगुरु दिसले, हवास मज तू आणि स्वप्नात रंगले मी… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पहाण्याची संधी मिळणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी दुपारी 1 वाजता हा सिनेमा प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे.