एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya : भारत गणेशपुरेंच्या नातवाची थुकरटवाडीत एन्ट्री! आजोबांसोबत आता नातूही हसवणार

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत गणेशपुरे यांच्या नातवाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Bharat Ganeshpure Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या नातवाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. 

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागापासून भारत गणेशपुरे या कार्यक्रमाचा भाग आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अल्पावधीतच घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख मिळाली आहे. आता याच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा नातू त्याच्या करिअरला सुरुवात करत आहे. 

'चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास' नव्या पर्वात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'चला हवा येऊ द्या-लहान तोंडी मोठा घास' असं या नव्या पर्वाचं नाव आहे. नुकत्याच या पर्वाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. 15 मेपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

भारत गणेशपुरे यांच्या नातवाचं नाव अयांश कपिले असं आहे. तो भारत गणेशपुरे यांच्या भाचीचा मुलगा आहे. तो फक्त साडेचार वर्षांचा असून त्याने आता शूटिंगला सुरुवात केली आहे. अयांशला अभिनयाची ओढ कशी लागली असे त्याच्या आईला विचारले असता त्या म्हणाल्या,"माझी आत्या माझ्या बहिणीच्या लग्नात अमरावतीला आली होती तेव्हा तिने अयांशला पाहिले. तिने अयांशची मस्ती, त्याचे बोलणे, त्याचा डान्स पाहिला तेव्हा तिला अयांशमध्ये टॅलेंट दिसले. माझे मामा भारत गणेशपुरेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करीत आहेत त्यामुळे त्यांनी मला अयांशला या कार्यक्रमाच्या ऑडिशनबद्दल सांगितलं. अशी अयांशची अभिनयाची सुरुवात झाली". 

'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये बच्चे कंपनीची कॉमेडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Chala Hawa Yeu Dya: मोठ्यांनाही लाजवेल अशी बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; ‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहून खळखळून हसाल

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Ashok Saraf KBC: 'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...
'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget