Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मल्हारसाठी गायलं गाणं; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजनं मल्हारला एक गाणं गाऊन दाखवलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर मल्हारला खूप आनंद होतो.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. मल्हार हाच स्वराजचा बाबा आहे, हे आता स्वराजला सर्वांना सांगायचं आहे. स्वराज गेल्या काही दिवसांपासून हे मल्हारला सांगायचा प्रयत्न करत आहे. आता स्वराजनं मल्हारला एक गाणं गाऊन दाखवलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर मल्हारला खूप आनंद होतो.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराजचं गाणं ऐकल्यानंतर मल्हार म्हणतो, 'सरस्वती तुझ्यावर अशीच कृपा करो, तुला मी म्हटलं होतं आनंदाची बातमी देईल ती अशी आहे की, आपण ज्या गाण्याच्या स्पर्धेक भाग घेतला होता, त्या स्पर्धेच्या परीकांनी तुला वाईल्ड कार्ड एन्ट्री द्यायचं ठरवलं आहे.'
यावर मल्हार म्हणतो, 'गुरूजी खूप खुश आहे मी' आता मल्हार हा स्वराचा बाबा आहे, हे स्वराज उर्फ स्वरा सर्वांना सांगणार का? हे लवकरच प्रेक्षकांना समजेल.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसले की, स्वराजचं नाव स्वरा आहे, हे देखील विजय आणि क्षमा यांना माहित असते. विजय आणि क्षमा यांना सत्य माहित आहे, हे स्वराला माहित नसते. त्यामुळे स्वरा दु:खी होते. ती म्हणते, 'मला तुमचा खूप राग आला आहे. तुम्ही मला सांगितलं नाही की, तुम्हाला सर्व माहित आहे. तुम्ही असं का केलं? तुम्हाला माझी दया आली नाही का?''
'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. या मालिकेतील मंजुळा ही भूमिका देखील ऊर्मिला कानेटकर साकारते.
इतर महत्वाच्या बातम्या: