एक्स्प्लोर

Swayamvar Mika Di Vohti : मिकाच्या स्वयंवरात कृष्णा थिरकला 'सामी-सामी' गाण्यावर; 'मिका दी वोटी' चा धमाकेदार एपिसोड

Swayamvar Mika Di Vohti :  कृष्णानं पुष्पा चित्रपटातील 'सामी-सामी' गाण्यावर डान्स केला.

Swayamvar Mika Di Vohti :  प्रसिद्ध गायक  मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या  'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti)  या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये  कपिल शर्मा (Kapil Sharma), कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek), दिलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये  कृष्णानं पुष्पा चित्रपटातील 'सामी-सामी' गाण्यावर डान्स केला. 
 
कृष्णा अभिषेकनं 'स्वयंवर: मिका दी वोटी' च्या सेटवर चेहऱ्यावर ओढणी घेऊन एन्ट्री केली. 'मैं आई हूं यूपी-बिहार लूटने' या गाण्यावर तसेच सामी-सामी या गाण्यावर मिका सिंहसोबत कृष्णानं डान्स केला. 'स्वयंवर: मिका दी वोटी' च्या पहिल्या एपिसोडमध्ये शोमध्ये सहभागी झालेल्या 12 मुलींनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या तसेच या मुली त्यांच्या वेगवेगळ्या अंदाजानं मिकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. 

View this post on Instagram
 
A post shared by STAR Bharat (@starbharat)

मिकाच्या स्वयंवरात पहिल्याचं दिवशी भांडण

नीत आणि बुशरा यांच्यामध्ये स्वयंवराच्या पहिल्याच दिवशी भांडण झालं. या एपिसोडच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नीत ही बुशरा म्हणते, 'गेम ही नेहमी आपल्या लेव्हलच्या खेळाडूसोबत खेळावा.' यावर बुशरा म्हणते, 'मिका सिंह ट्रोफी नाहीये, इथे तू काय जिंकायला आणि हरायला आली आहे?' यावर नीत म्हणते, मी इथे कोणालाच माझा स्पर्धक मानत नाही. त्यानंतर बुशरा म्हणते, 'ये तो सच में सस्ती वाली कटरीना कैफ है' हे ऐकून मिका देखील थक्क होतो. 

'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मिका हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Embed widget