(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कार्यक्रमाचं निमित्त झालं आणि सूत जुळलं; ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाची लव्हस्टोरी
जय मल्हार मालिकेतली बानू आणि काहे दिया परदेस मधील ऋषी सक्सेना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले आणि त्यांचं सूत जुळलं. मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
मुंबई : साधारण चारेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी झी मराठीवर दोन मालिका जोरदार चालू होत्या. एक होती खंडोबाची आणि दुसरी मालिका होती काहे दिया परदेस. खंडोबा मालिकेतली बानू, खंडोबा आदी व्यक्तिरेखा हिट झाल्या होत्या. तर इकडे काहे दिया परदेस मधील दोन्ही व्यक्तिरेखा जोरदार चालल्या. देवदत्त नागे, ईशा केसकर, ऋषी सक्सेना, सायली संजीव अशी कलाकार मंडळी इंडस्ट्रीला नव्याने मिळाली.
गोष्ट इथवर थांबली नाही. तर त्यावेळी या दोन्ही मालिकेतले कालाकर वेगवेगळ्या निमित्ताने भेटत होते. कधी पुरस्कार सोहळ्यामध्ये, तर कधी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. यातलाच एक कार्यक्रम होता चला हवा येऊ द्या. त्यावेळी काहे दिया आणि खंडोबा अशा दोन्ही मालिकांमधले कलाकार एकत्र आले होते. तिथे ओळख झाली काहे दिया परदेस मधील ऋषी सक्सेनाची आणि ईशा केसकरची.
View this post on Instagram
हॅंडसम ऋषी आणि टपोऱ्या डोळ्याची ईशा यांच्यात एकदम मैत्री जमली. निमित्त होतं चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचं. पण तिथे झालेली मैत्री नंतर एकदम नात्यात बदलली. या कार्यक्रमात इशा आणि ऋषी यांच्यात गप्पा सुरु झाल्या. त्यावेळी ऋषीने ईशाला काही मराठी शब्दांचे अर्थही विचारले. ईशानेच यासंदर्भात माहिती दिली आहे. ऋषीचा स्वभाव इशाला आवडला. मोकळीक वाढली आणि मग ही मैत्री त्या पलिकडे गेली.
ईशा आणि ऋषी यांच्यातलं डेटिंग ही नवी बाब उरलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे डेट करत आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मधल्या काळात दोघांनी एक ट्रीपही केली. दोघांनी आपलं नातं लपवलेलं नाही. अर्थातच हे दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सला लागली असेलच. पण आता हे नातं कधी पुढचं वळण घेणार ते मात्र अद्याप कळलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या :