एक्स्प्लोर

सरस्वतीच्या विणेप्रमाणे झंकारणारा किशोरी आमोणकरांचा स्वर!

किशोरी आमोणकरांनी ‘सहेला रे’ गायलं आणि राग भूप अमर झाला. त्या स्वरांनी जणू विझलेल्या दिव्यांमध्ये पुन्हा अग्नी जागृत केला. काहींना तो अनादिकालाच्या गर्भातून आलेल्या ध्वनीसारखा वाटला. जेव्हा सरस्वतीची वीणा पहिल्यांदा झंकारली होती, स्वर जन्मला होता आणि संगीताची निर्मिती झाली होती, तोच स्वर जणू पुन्हा उमटला होता. म्हणून त्याला ‘गानसरस्वती’चा स्वर म्हटलं गेलं. तो स्वर आज काळाच्या उदरात निमला. गानसरस्वती किशोरी आमोणकरांचं 3 एप्रिल सोमवारी निधन झालं. किशोरीबाई महान गायिका होणार हे जणू काळाच्या कपाळावर लिहिलेलं सत्य होतं. आई मोगूबाई कुर्डीकरांच्या कडक शिस्तीत त्या तालीम घेत होत्या. अथक रियाज करत होत्या. जयपूर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होत होते. पण त्यात वयाच्या 25व्या वर्षी एक अपशकुन घडला. त्यांचा आवाज एकाएकी गेला. इथे अध्यात्म आणि आयुर्वेद कामी आलं. दोन वर्षांत त्या पुन्हा गाऊ लागल्या आणि किशोरीयुग सुरू झालं. आपल्या अभ्यासपूर्ण आणि भावप्रधान गायकीनं त्यांनी रसिकांवर गारूड केलं. आईच्या आणि घराण्याच्या सावलीत राहूनही त्यांनी गायकीत नवनवे प्रयोग केले. त्यांच्या या बंडामुळे ज्येष्ठ नाराज झाले. पण स्थितप्रज्ञ किशोरीबाईंनी आपली शैली तयार केली आणि पाहता पाहता त्या संगीतक्षेत्रातल्या एक विदुषी झाल्या. शास्त्रीय गायकीवरची त्यांची श्रद्धा त्यांनी कायम ठेवली. त्याशिवाय जर किशोरीबाईंना कशाने भुरळ घातली असेल तर ती मीरेच्या आणि कबीराच्या भजनांनी. भक्तिरस जणू स्वरांमध्ये ओथंबून आला. किशोरीबाईंनी संगीत व्रताप्रमाणे मानले. त्यामुळेच ते अथक रियाजाचे आणि कडक शिस्तीचे होते. जी शिस्त त्यांनी पाळली तिची अपेक्षा त्यांनी श्रोत्यंकडूनही ठेवली. जिथं ती पूर्ण झाली नाही तिथं त्यांनी कोणाचीच गय केली नाही. उथळ टाळ्या त्यांना कधीही मिळवायच्या नव्हत्या. एकांत गुहेत संगीतसाधना करणाऱ्या त्या योगिनी होत्या. संगीत हे मनोरंजनाचे साधन नव्हे तर अभ्यासाने सिद्ध होणारी विद्या आहे असे त्या मानत. म्हणूनच 'रागरससिद्धांत' हा संगीतशास्त्रावर ग्रंथराज त्यांनी लिहिला. किशोरीबाईंची शिष्यपरंपराही त्यामुळेच प्रचंड आहे. 85 वर्षांचा हा दैवी स्वर शेवटपर्यंत थकला नाही. सरस्वतीच्या विणेप्रमाणे झंकारत राहिला. संबंधित बातम्या: ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर काळाच्या पडद्याआड 'गानसरस्वती'ला संगीत जगतातील मान्यवरांची आदरांजली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: 'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Embed widget