(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kaun Banega Crorepati 14 : 75 लाख नाही जिंकू शकले दुलीचंद; केबीसीमधील 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का?
Kaun Banega Crorepati 14 : दुलीचंद यांनी 50 लाख जिंकले. पण ते 75 लाख जिंकू शकले नाहीत. कोणत्या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, ते जाणून घेऊयात...
Kaun Banega Crorepati 14 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’चा(Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एका एपिसोडमध्ये छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) राहणारे दुलीचंद अग्रवाल हे सहभागी झाले. दुलीचंद हे 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर येणं हे माझं स्वप्न होतं, असे दुलीचंद अग्रवाल म्हणाले. दुलीचंद यांनी 50 लाख जिंकले. पण ते 75 लाख जिंकू शकले नाहीत. कोणत्या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, ते जाणून घेऊयात...
75 लाखांचा प्रश्न
दुलीचंद यांनी 50 लाख रुपये जिंकले. पण 75 लाख मात्र ते जिंकू शकले नाहीत. 75 लाखांसाठी त्यांना 'इतिहासातील कोणत्या संघर्षादरम्यान नाटोने प्रथमच युद्ध केले?' हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी त्यांना चार ऑप्शन्स देखील देण्यात आले. खाडी युद्ध,सोवियत-अफगान युद्ध, साइप्रस युद्ध, बोस्निया युद्ध हे चार ऑप्शन होते. दुलीचंद यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. त्यांना दुसरा पर्याय हा योग्य वाटत होता पण अमिताभ बच्चन यांनी दुलीचंद यांना सांगितलं की, जर त्यांचे उत्तर चुकलं तर ते 50 लाखांवरुन 3 लाख 20 हजारवर येतील. त्यानंतर दुलीचंद यांनी हा खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला.
हे होतं उत्तर
प्रश्नाचं उत्तर बोस्निया युद्ध हे होतं. अमिताभ यांनी प्रेक्षकांना प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगितल्यावर पन्नास लाखांचा चेक दुलीचंद यांना दिला. तसेच अमिताभ बच्चन यांनी दुलीचंद यांच्यासोबत 'शतरंज के खिलाडी'बाबत एक गोष्ट शेअर केली. 'शतरंज के खिलाडी' या सिनेमाचं कथानक अमिताभ बच्चन यांनी लिहिलं असल्याचं ते म्हणाले.
कौन बनेगा करोडतीच्या 14 व्या सिझनच्या सुरुवातीला आमिर खाननं हजेरी लावली होती. आमिर त्याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमामध्ये आला होता. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर, त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.
वाचा इतर बातम्या: