(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KBC 14: 'या' प्रश्नाचं उत्तर देऊन श्रुती डागा जिंकल्या 50 लाख ; तुम्हाला माहित आहे का उत्तर?
श्रुती डागा यांनी ‘कौन बनेगा करोडती’ (Kaun Banega Crorepati) मध्ये 50 लाख जिंकले आहेत.
Kaun Banega Crorepati 14 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’चा(Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधून स्पर्धक सहभागी होतात. गेल्या भागात छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) राहणारे दुलीचंद अग्रवाल हे सहभागी झाले होते. आता या शोमध्ये श्रुती डागा या सहभागी झाल्या आहेत. श्रुती यांनी 50 लाख जिंकले. जाणून घेऊयात कोणत्या प्रश्नाचं उत्तर जिंकल्यानंतर श्रुती यांनी पन्नास लाख पटकावले आहेत.
केबीसी-14 (10 ऑगस्ट) च्या एपिसोडमध्ये मुंबईमध्ये राहणारा समित शर्मा हॉटसीटवर बसला होता. समित हा कॉपी रायटर असून तो एका जाहिरात एजन्सीत काम करतो. समित शर्माने सुरुवात चांगली केली असेल, पण 3 लाख 20 हजार रुपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यानं तो केवळ 10 हजार रुपये जिंकला. समितनंतर कोलकाता येथील रहिवासी असलेल्या श्रुती डागाने हॉटसीटवर आल्या. 'कोणत्या संस्थेने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया विकसित आणि व्यवस्थापित केली आहे?' हा प्रश्न त्यांना पन्नास लाख रुपयांसाठी विचारण्यात आला. यावेळी श्रुती यांना चार पर्याय देखील देण्यात आले. एक- भारतीय विज्ञान संस्थान, दुसरा- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिसरा जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय आणि चौथा- अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी
श्रुती यांनी लाईफलाईन वापरली
श्रुती डागा यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लाईफलाईनचा वापर केला. त्यांनी फोन अ फ्रेंड ही लाईफलाईन वापरली. या लाईफलाईनद्वारे त्यांनी कॉलेजमधील त्यांच्या एका ज्युनिअरला फोन केलं. पण त्यांना देखील या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. त्यानंतर श्रुती यांनी रिस्क घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे उत्तर दिलं. श्रुती यांचं हे उत्तर बरोबर होतं.
View this post on Instagram
आज (11 ऑगस्ट) श्रुती यांना 70 लाखांचा प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्या 70 लाख जिंकतील का? या प्रश्नाचं उत्तर आज प्रेक्षकांना मिळेल.
वाचा इतर बातम्या: