Karan Gunhyala Mafi Nahi : अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'कारण गुन्ह्याला माफी नाही'
Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Karan Gunhyala Mafi Nahi : नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार (Ashwini Kasar) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ (Karan Gunhyala Mafi Nahi) या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अश्विनी पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी निरनिराळ्या मालिकांमधून आणि निरनिराळ्या व्यक्तिरेखांमधून अश्विनी कासार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे.
‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहे. हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार हीसुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळणार आहे. यांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेची झलक जेव्हापासून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
अश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 1 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे. "स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' गुन्हेगारांना शोधून काढणार! 'कारण गुन्ह्याला माफी नाही", असं म्हणत या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे.
अश्विनी कासारबद्दल जाणून घ्या...
छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा आवडता चेहरा म्हणून अभिनेत्री आश्विनी कासारला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी-हिंदी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘कमला’ या मालिकेने अश्विनीला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. 'सोयरे सकळ’ या व्यावसायिक नाटकातही तिने काम केलं आहे. आश्विनीने “एक होतं माळीण” या चित्रपटात ही प्रमुख भूमिका साकारली होती. आश्विनीने 2019 मध्ये सावित्रीज्योती या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम केले होते. स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी अवहेलना झेलून काम करणाऱ्या फुले दांपत्याच्या कामावर आधारित ही मालिका होती.
संबंधित बातम्या