एक्स्प्लोर
मानेवरील सर्जरीनंतर कपिल रुग्णालयातून थेट शूटिंगला
मुंबई : विनोदी कलाकारांना आपले वैयक्तिक त्रास बाजूला ठेवून जगाला हसत ठेवण्याचं काम सतत करावं लागतं. असंच काहीसं कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या बाबतीत घडतंय. मानेवरील एका छोट्याशा शस्त्रक्रियेनंतर कपिल रुग्णालयातून थेट शूटिंगला उभं राहिल्याचं म्हटलं जातं.
सोनीवर सुरु झालेला 'द कपिल शर्मा शो' कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये अव्वल स्थानावर गेला आहे. मात्र हे यश मिळवण्यासाठी कपिलला जीवाचा आटापिटा करावा लागतोय, असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
कपिल शर्माच्या शो मध्ये बॉलिवूडस्टार गोविंदा हजेरी लावणार होता. त्याच दिवशी कपिलच्या मानेवरील गळूची शस्त्रक्रिया पार पडणार होती. गोविंदाकडून खूप दिवसांनी चित्रीकरणाची वेळ मिळाल्याने शूट पुढे ढकलणं शक्य नव्हतं. पुन्हा ही संधी मिळण्याची शक्यताही धूसर होती.
कपिलने शस्त्रक्रियेनंतर शूट करण्याची परवानगी डॉक्टरांकडे मागितली. डॉक्टरांनी हिरवा कंदिल दिल्यामुळे कपिलने थेट चित्रीकरणाला हजेरी लावली. सर्जरी लहानशी असली तरी कपिलच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement